नागपूर/अरूण कराळे (खबरबात):
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.त्यासाठी डॉक्टर, पोलिस,स्वच्छता कर्मचारी,पत्रकार रस्त्यावर उतरले आहेत आणि कोरोनाचा फैलाव थांबविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे.आपणही आपले आद्यकर्तव्य तसेच सामाजिक दायित्व समजून सहकार्य करणे ही काळाची गरज आहे.असे विचार वेल्ट्रीट हॉस्पिटलचे संचालक डॉ. राहुल ठवरे यांनी व्यक्त केले.
येथील वेलट्रीट मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल तर्फे एमआयडीसी वाहतूक पोलिस शाखेतील ३५ पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करून कोरोना आजाराची लक्षणे सांगून प्रतिकात्मक उपाययोजना बद्धल विस्तृत माहिती देऊन हॉस्पिटलचे संचालक डॉ. राहुल ठवरे यांनी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जाधव यांना थर्मामिटर मशीन भेट देण्यात आली.
शिबिरात डॉ .कौस्तुभ वंजारी,डॉ. अश्विनी ठवरे,डॉ. राजेश विपिन समर्थ, छाया गोडबोले,आदींनी पोलीस कर्मचाऱ्याच्या आरोग्याची तपासणी केली. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक विनोद गिरी,पोलिस उपनिरीक्षक किशोर गवई, हवालदार बाळू चव्हाण,विनोद सिंग,जयशंकर पांडे, विलास कोकाटे,देवकुमार मिश्रा,रवींद्र गजभिये, सुरेश तेलेवार, मिलिंद कोल्हे,रितू बोरकर प्रामुख्याने उपस्थित होते.