जुन्नर / आनंद कांबळे
कोरोना सारख्या संसर्गजन्य रोगाने शहारापाठोपाठ ग्रामीण भागात ही पाय पसरू लागला आहे आरोग्य क्षेत्रात डॉकटर , नर्स , आया यांच्या बरोबर ग्रामीण भागात "आशा सेविका " देखील काम करीत आहे .घरोघरी जाऊन लोकांचा सर्व्हे करताना त्यांना देखील अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे .ऑस्ट्रेलिया मध्ये नोकरी करणारे चिंचोली चे संतोष शांताराम काशिद यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र , येणेरे तील आशा सेविकांना "आरोग्य रक्षक कीट " मोफत दिले .
या आरोग्य कीट मध्ये रक्तदाब तपासणी यंत्र , मधुमेय तपासणी यंत्र , तापमापक यंत्र , मास्क व सॅनिटायझर चा समावेश आहे .या आशा सेविका ग्रामीण भागात अत्यन्त अल्प मानधनावर काम करीत आहे .
याच वेळी डीसेन्ट फाउंडेशन च्या माध्यमातून धालेवाडी चे सागर विधाटे यांनी देखील गोळेगाव व धालेवाडी मधील आशा सेविकांना आरोग्य रक्षक कीट उपलब्ध करून दिले.
या प्रसंगी पंचायत समिती, जुन्नर चे आरोग्य अधिकारी डॉ अजय गोडे , येणेरे केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ सौ हेमलता शेखरे, डीसेन्ट फाउंडेशन चे संस्थापक जितेंद्र बिडवई , श्री ब्रह्मनाथ विध्यामंदिर , पारुडे चे माजी मुख्याध्यापक श्री एफ बी आतार , सामाजिक कार्यकर्ते श्री संदिप पानसरे ,गुरुवर्य कोंडाजी बाबा डेरे वारकरी संस्थेचे व्यवस्थापक शंकर पवार, नर्सेस, आशा सेविका उपस्थित होते .