चंद्रपूर जिल्हातील अॅक्टीव्ह बाधिताची
संख्या २९
आतापर्यंतचे कोरोना बाधित ५५
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील आवलगाव येथील आणखी एका २५ वर्षीय युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज गुरुवारी जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या वृत्तानुसार गांगलवाडी येथील कोरोना बाधिताच्या संपर्कातील हा युवक असून १७ जून रोजी या युवकाचा घेण्यात आलेला स्वॅब पॉझिटिव्ह असल्याचे आज वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे.
आवलगाव येथील हा युवक मुंबईवरुन १४ तारखेला अन्य तीन सहकार्यांसोबत पोहचला होता. यांच्यासोबतच्या अन्य दोन नागरिक वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील आहेत. ते पुलगावला थांबले. १४ तारखेला गावात पोहोचल्यानंतर या युवकाला शाळेमध्ये संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यानंतर १६ जुन रोजी ब्रह्मपुरी कोविड केअर सेंटर मध्ये दाखल करण्यात आले. १७ जून रोजी त्याचे स्वॅब घेण्यात आले. १८ जूनला त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या पॉझिटिव्ह अहवालामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह बाधिताची आतापर्यंतची संख्या ५५ झाली आहे. जिल्ह्यामध्ये सध्या ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह बाधितांची संख्या २९ आहे.
चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक बाधित ), १३ मे ( एक बाधित) २० मे ( एकूण १० बाधित ) २३ मे ( एकूण ७ बाधित ) व २४ मे ( एकूण बाधित २ ) २५ मे ( एक बाधित ) ३१ मे ( एक बाधित ) २जून ( एक बाधित ) ४ जून ( दोन बाधित ) ५ जून ( एक बाधित ) ६जून ( एक बाधित ) ७ जून ( एकूण ११ बाधित ) ९ जून ( एकूण ३ बाधित ) १०जून ( एक बाधित ) १३ जून ( एक बाधित ) १४ जून ( एकूण ३ बाधित ) १५ जून ( एक बाधित ) १६ जून ( एकूण ५ बाधित ) १७जून ( एक बाधित ) आणि १८ जून ( एक बाधित ) अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधित ५५ झाले आहेत.आतापर्यत २६ बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे ५५ पैकी अॅक्टीव्ह बाधितांची संख्या आता २९ झाली आहे.