Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जून १०, २०२०

टेकडी वाडी परिसरात कोरोना पॉजिटीव्ह





वाडीच्या भोवताल सापडत आहे कोरोना पॉजिटीव्ह

नागपूर/ अरूण कराळे( खबरबात)
वाडी नगरपरिषद परिसराच्या काठावर तर मनपा नागपूरच्या क्षेत्रात असणाऱ्या वैभवनगर टेकडीवाडी परिसरात लता मंगेशकर रुग्णालयात उपचार घेणारी एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक वैभवनगर टेकडीवाडी परिसर मनपा क्षेत्रात येत असला तरी वाडी न.प. लागून आहे. येथील महिला लता मंगेशकर हास्पिटल हिंगणा येथे उपचार घेत होती.उपचारादरम्यान घेण्यात आलेल्या कोरोना टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळल्याने वाडीत एकच खळबळ उडाली. या महिलेचा डॉ. आंबेडकर नगरातील डॉ. बन्सोड यांच्याशी संपर्क असल्याने वाडीतील स्थानिक प्रशासन आणि नागरिकांची चिंता वाढली. मागील दोन महिन्यांपासून कोरोना आणि लॉकडाऊनच्या भीतीने नगरपरिषद, आरोग्य विभाग, पोलिस विभागाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आणि नागरिकांच्या सहकार्याने वाडीत कोरोनाचा रुग्ण आढळला नाही. पुणे, मुंबई किंवा इतर राज्यातील कामगार वाडीत येथे परत आले. याचे सर्वेक्षणसुद्धा झाले. काहींना होम क्वारंटाईन करण्यात आले. वाडीत कोणतीही शंका आढळली नसल्याने नागरिक, नगरपालिका आणि पोलिस विभागांनाही दिलासा मिळाला.लॉकडाऊनमध्ये शिथिलताही देण्यात आली होती. दुकाने सुरू झाली,बाजारपेठेत गर्दी होऊ लागली,वाहतुकीचा व्यवसाय सुरू झाला परंतु लोकांच्या हलगर्जीने शारीरिक अंतराची फज्जा उडाला.त्याचा विपरीत परिणामामुळे वाडी नगरपरिषद सीमेपासून आसपासच्या काही भागात कोरोनाचे रुग्ण उघडकीस आले.विशेषत: दवलामेटी येथील पुरुषोत्तमनगरात शनिवारी मुंबईवरून आलेले १२ सदस्यांपैकी १ महिला पॉझिटिव्ह आढळली. आता वाडीला लागून असलेला वैभवनगरातील एका महिलेवर उपचार सुरू असताना तपासणीत पॉझिटिव्ह आढळल्याने येथील नागरिकांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे.
वैभवनगर मनपा क्षेत्रात येत असला तरी तेथील लोकांचा व्यवहार वाडीसोबत जास्त आहे.वाडी येथील डॉ. आंबेडकरनगर येथील डॉ. बनसोड यांच्याशी संपर्क असल्याने डॉक्टर कुटुंबाला वाडी न.प. आरोग्य विभागाने होम क्वारंटाईन केले. संबंधित महिलेच्या कुटुंबातील सदस्यांना नागपूर येथे क्वारंटाईनकरिता नेण्यात आले आहे.स्थानिक प्रशासनाने लॉक डाऊन मध्ये शिथिलता देताच नागरिक सैतानसारखे वागत शासकीय नियमाची पायमल्ली होतांना शहरातील चित्र असून स्थानिक प्रशासनाने कठोर भूमिका घेत सक्तीची कार्यवाही करणे तसेच पोलीस गस्त वाढविणे अत्यंत गरजेचे आहे अन्यथा वाडीची मुंबई व्हायला वेळ लागणार नाही.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.