महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेनेची मागणी
नागपूर- महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेना, नागपूर विभागाच्या वतीने विदर्भातील शाळांच्या उन्हाळी दीर्घ सुट्या नंतर दि.26 जून रोजी शाळेत रुजू होण्या संदर्भातील शिक्षकांचा संभ्रम दूर करण्याची मागणी करणारे निवेदन मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, विभागीय आयुक, जिप सीईओ व शिक्षणाधिकारी यांना ई-मेल द्वारे सादर करण्यात आले आहे.
सन 2019-20 मधील उन्हाळी शालेय सुट्या दि. 2 मे ते 25 जून 2020 घोषित करण्यात आल्या आहेत.
परंतु कोविड -19 च्या लॉक डाऊन मुळे शाळा साधारणतः 16/17 मार्च पासून बंद करून मुख्याध्यापक/शिक्षक सुद्धा 20/21 मार्चपासून शाळेत उपस्थित होऊ शकले नाहीत.
दरम्यान कोविड-19 आपत्ती व्यवस्थापन कर्तव्यावर बरेचसे शिक्षक अजूनही कार्यरत आहेत.
सध्या नवीन शैक्षणिक सत्र टप्याटप्याने क्रमशः जुलै ते सप्टेंबर 2020 मध्ये सुरू करण्याचे शासन आदेश आहेत.
प्राथमिक शिक्षकांना दीर्घ सुट्या उपभोगण्यासाठी शैक्षणिक सत्राचे अंतिम दिवशी किंवा पहिल्या दिवशी रुजू असणे अनिवार्य असल्याचा सर्वसाधारण नियम शिक्षकांना सर्वश्रुत असल्याने शिक्षकांकडून दि.26 जून रोजी रुजू व्हावे किंवा कसे ? याबाबत संभ्रमात आहेत.
सध्या लॉक डाऊन 30 जून पर्यंत असल्याने व शाळा वर्ग निहाय (नववी ते बारावी, सहावी ते आठवी, तिसरी ते पाचवी व नंतर पहिली ते दुसरी) टप्प्याटप्प्याने सुरू होणार असल्याने शिक्षकांनी नेमके कोणत्या महिन्यात शाळेवर रुजू व्हावे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
करीता याबाबत कोणत्या (HM/UGT/GT) शिक्षकांनी शाळेत केव्हा रुजू व्हावे ? याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्याची विनंती मनसे शिक्षक सेनेचे राज्य सरचिटणीस शरद भांडारकर व राज्य सरचिटणीस महेश जोशी यांचे नेतृत्वात संजय चामट, मनोज घोडके, नितीन किटे, नारायण पेठे, नंदकिशोर उजवणे, हरिश्चंद्र दहाघाणे, श्रीराम वाघे, अलका मुळे, रंजना भोयर, अरविंद आसरे, अशोक डहाके, गुणवंत ईखार, दिपचंद पेनकांडे, मोरेश्वर तडसे, चंद्रकांत मासुरकर, वामन सोमकुवर, नरेश धकाते, प्रदीप दुरगकर, प्रवीण मेश्राम, सुनील नासरे, तुकाराम ठोंबरे, प्रकाश काकडे, कमलाकर हटवार, राजू अंबिलकर, हिरामण तेलंग, भावना काळाने, कल्पना दषोत्तर, आशा बावनकुळे, ललिता रेवतकर इत्यादींनी केली आहे.