Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जून १९, २०२०

आता चंद्रपुरताच होणार कोरोना तपासणी:जिल्ह्यात 218 कोटींची प्रयोगशाळा 3 जून पासून सुरु


चंद्रपूर(खबरबात):
 जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता स्वॅब नमुन्यांची तपासणी जिल्ह्यामध्येच व्हावी यासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे 2.18 कोटींची प्रयोगशाळा 3 जून पासून सुरु झाली आहे.

जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या नेतृत्वात या प्रयोगशाळेमध्ये (वायरल रिसर्च अँड डायग्नोस्टिक लॅबोरेटरी) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.एस.मोरे यांच्या मार्गदर्शनात नोडल अधिकारी डॉ. राजेंद्र सुरपाम तसेच प्रशिक्षित वर्ग कार्य करीत आहे. यामध्ये एक सहाय्यक प्राध्यापक, दोन व्याख्याता, 18 तंत्रज्ञ, तीन ट्युटर, दोन लिपिक, दोन डाटा एंट्री ऑपरेटर अहोरात्र काम करीत आहे.

प्रयोगशाळेमध्ये 14 प्रकारची यंत्रसामुग्री लावण्यात आली आहे. यातील सर्वात महत्त्वाची आरटी-पीसीआर (रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन-पॉलिमरेज चेन रिएक्शन) ही मशीन आहे. या मशीन अंतर्गतच स्वॅब नमुने तपासले जातात. काही यंत्रसामुग्री सिंगापूर येथून मागविण्यात आलेली आहे. तसेच तपासणीसाठी लागणारे किट भोपाळ वरून मागविण्यात आली आहे.आईसीएमआर (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) यांची परवानगी घेऊन हि यंत्रसामुग्री बसविण्यात आली आहे. या परवानगी नंतर मशीनचे प्रमाणीकरण करण्यासाठी एआयआयएमएस नागपूर(ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स नागपुर) यांच्या अंतर्गत स्वॅब नमुन्यांची तपासणी केल्या जाते.त्यामुळे ही मशीन वैध आहे की नाही हे समजल्या जाते.
अशी आहे अद्ययावत प्रयोगशाळा
सध्या या प्रयोगशाळेत एका दिवशी 150 ते 160 स्वॅब नमुने तपासल्या जातात. नंतर, याची क्षमता वाढवून 250 पर्यंत करणार आहे. एकावेळी 100 स्वॅब नमुने तपासले जातात. स्वॅब नमुन्यांचा अहवाल येण्यासाठी 6 तास लागतात. या प्रयोगशाळेच्या माध्यमातून 3 जून ते आजपर्यंत 1 हजार 250 स्वॅब नमुने तपासण्यात आले आहेत.

प्रयोगशाळेमध्ये तीन विभागात काम चालते. पहिल्या विभागात सुरक्षिततेसाठी फायर सेफ्टी, दुसऱ्या विभागात मशिनरी कशी वापरतात याविषयीचे मार्गदर्शन तर तिसऱ्या विभागात पीपीई किट वापरून स्वॅब नमुने तपासल्या जातात. या विभागांतर्गत अगोदरच 10 दिवसांसाठी लागणाऱ्या साहित्याची व्यवस्था केली जाते. नमुना अहवाल आल्यानंतर दररोज आईसीएमआर( इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च), डिएमईआर यांना पाठविल्या जातो.

या प्रयोगशाळेत सुरक्षा आणि स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आली आहे. स्वॅब नमुने तपासणीसाठी पीपीई किटचा वापर केल्या जातो. तपासणी झाल्यानंतर पीपीई किटची विल्हेवाट लावण्यात येते. सर्व प्रयोगशाळेचे सॅनीटायइज करणे, स्वच्छता करणे इत्यादी बाबी प्रामुख्याने केल्या जातात. तसेच सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत आहे.

स्वॅब नमुने तपासण्यासाठी या प्रयोगशाळेमध्येच नमुने घेतल्या जातात. तसेच काही स्वॅब नमुने तालुक्याचे ठिकाणी निर्माण करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये सुद्धा घेण्यात येतात. या सेंटर मधून स्वॅब नमुने एकत्र केल्या जातात. नंतर हे स्वॅब नमुने प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी आणल्या जातात.

या प्रयोगशाळेमध्ये आता चंद्रपूर पाठोपाठ गडचिरोली येथील स्वॅब नमुने सुद्धा तपासणीसाठी येणार आहेत. त्यामुळे नमुन्यांचा अहवाल लवकर येण्यास मदत होणार आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.