ब्रम्हपुरी तालुक्यातील अडयाळ टेकडी येथील संस्थात्मक अलगीकरणात असणारे २८ वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याचा स्वॅब अहवाल आला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार हा युवक मुंबई येथून आल्यानंतर संस्थात्मक अलगीकरणात होता. २ जून रोजी त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता.
मात्र अहवाल अनिश्चित होता. लक्षणे दिसून आल्याने काल ५ जून रोजी युवकाचा पुन्हा स्वॅब अहवाल घेण्यात आला होता. आज त्यांचा अहवाल कोरोना बाधीत आला आहे. बाधीताची प्रकृती स्थिर आहे.या सोबतच जिल्हयातील कोरोना बाधीतांची संख्या २८ झाली आहे.
चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक बाधीत ), १३ मे ( एक बाधीत) २० मे ( एकूण १० बाधीत ) २३ मे ( एकूण ७ बाधीत ) व २४ मे ( एकूण बाधीत २ ) २५ मे ( एक बाधीत ) ३१ मे ( एक बाधीत ) २जून ( एक बाधीत ) ४ जून ( दोन बाधीत ) ५ जून ( एक बाधीत ) ६जून ( एक बाधीत ) अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधीत २८ झाले आहेत.आतापर्यत २२ बाधीत बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे २८ पैकी अॅक्टीव्ह बाधीतांची संख्या आता ६ आहे.