चंद्रपूर/ प्रतिनिधी
वरोरा पोलिस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक (पोलीस स्टेशन वरोरा जिल्हा) रमेश खाडे यांना 10 हजारांची लाच घेताना सापळयात अटक करण्यात आली.
तक्रारदार हे चंद्रपूर येथील रहिवासी असून पो.स्टे. वरोरा येथील अपघाताच्या गुन्ह्यात आरोपी न करण्याच्या कामाकरीता पोलीस स्टेशन वरोरा येथील रमेश खाडे, सहायक पोलीस निरीक्षक यांनी तकारदारास १०,०००/-रु. लाच रकमेची मागनी केली. परंतु तकारदार यांची आलोसे यांना लाच रक्कम देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांचे विरुध्द लाप्रवि कार्यालय चंद्रपूर येथे तक्रार दिली.
प्राप्त तक्रारीवरून दिनांक १६.०६.२०२० रोजी केलेल्या पडताळणी कार्यवाही मध्ये तडजोडीअंती १०,०००/-रु. लाचेची मागणी स्पष्ट झाल्याने वरोरा शहरातील बोर्डा चौक येथे पंचासमक्ष केलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी रमेश संपतराव खाडे, वय ३० वर्षे, साहायक पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन वरोरा यांनी १०,०००/-रु. लाच रक्कम स्विकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असुन पुढील तपास कार्य सुरु आहे.
सदरची कार्यवाही ही श्रीमती रश्मी नांदेडकर, पोलीस उपायुक्त/पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि.नागपुर, श्री दुद्दलवार, अप्पर पोलीस अधिक्षक ला.प्र.वि.नागपूर,, तसेच पोलीस उपअधिक्षक श्री.अविनाश भामरे, ला.प्र.वि.चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात वैशाली ढाले, पोलीस निरीक्षक तसेच कार्यालयीन स्टॉफ नापोकॉ. अजय बागेसर, पो.कॉ, रविकमार ढेंगळे, रोशन चांदेकर, वैभव गाडगे व चालक दाभाडे यांनी यशस्वी पार पाडली आहे.