Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मे २७, २०२०

आँनलाईन राज्यस्तरीय बैठकीत कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रातील परिणाम व उपायावर चर्चा



तब्बल दोन तास चाललेल्या आँनलाईन राज्यस्तरीय बैठकीत कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रातील परिणाम व उपाय यावर खल अनेक उपाय सरकारला सुचविणार

नागपूर/ प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डाँ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परीषदेच्या राज्य कार्यकारिणीची आँन लाईन बैठक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पप्पू पाटील भोयर यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण नेव्हल यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 27 मे रोजी संपन्न झाली.

सदरील बैठकीत राज्य भरातील पदाधिकारी सहभागी झाले होते. बैठकीत डाँ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परीषदेच्या संघटनात्मक बांधणीवर चर्चा झाली. कोरोनामुळे राज्य व देशात शिक्षण क्षेत्रात दुरगामी परीणाम झाले यावर चिंता व्यक्त करण्यात आली. शिक्षणाची प्रकिया ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया असल्यामुळे ती खंडीत होता कामा नये त्यामुळे सरकारने नियोजित वेळेत विविध उपायांसह शाळा सुरु करण्यासाठी सुरू केलेल्या प्रयत्नांचे संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले.

सदरील चर्चासत्रात अनेकांनी आपली मते मांडली व सर्वानुमते संघटनेच्या वतीने खालील सुचना सरकारला* *पाठविण्याचा ठराव घेण्यात आला.*
*सुचना-*

*1. शासनाने राज्यातील प्रत्येक शाळेत कायमस्वरुपी पाण्याच्या स्त्रोत उपलब्ध करुन देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेवुन त्याची त्वरीत अंमलबजावणी करावी.*

*2. राज्यातील शाळांच्या थकीत विजबिलांसाठी आर्थिक तरतुद करण्यात यावी.खंडीत करण्यात* *आलेल्या विजजोडण्या विना खर्च जोडण्यात याव्यात.*
*3. राज्यातील ग्रामीण भागातील 80 % पालकांकडे स्मार्ट फोन नाहीत त्यामुळे आँनलाईन शिक्षणाची प्रक्रिया राबविण्यासाठी शाळेत पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात.*

*4. प्रत्येक शाळेला पुरेशे हँण्ड वाँश स्टेशन निर्माण करावेत शाळांना नियमित सँनिटायझर चा पुरवठा करावा.*

*5. पुरेशा वर्ग खोल्या नसलेल्या ,जास्त पटसंख्या असलेल्या शाळा दोन किंवा तीन शिप्ट मध्ये भरविण्याचे नियोजन करावे जेणेकरुन शोशल डिस्टंगशिंग पाळणे शक्य होईल.*

*6. एका वर्गात एकावेळी 20 पेक्षा जास्त विद्यार्थी नसावेत.*

*7. राज्यातील सर्व शिक्षकांची सेवा ही अत्यावश्यक सेवा मध्ये समाविष्ट करुन शिक्षकांना अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रदान करण्यात आलेल्या एक कोटीच्या विमा संरक्षणासह इतर सुविधांचा लाभ देण्यात यावा.*

*8. संचमान्यतेसाठी आधार कार्डची सक्ती कोरोना काळात करु नये व कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात झालेले स्थलांतर लक्षात घेता सन 2020-21 ची संचमान्यता करु नये.*

*9. शिक्षकांना केवळ शैक्षणिक कामच करु द्यावे इतर कामांसाठी त्यांची नेमणूक करू नये.*

*10. इयत्ता 1 ली ते 4 च्या शाळांमध्ये सुरु करण्यात आलेल्या 5वीच्या व इयत्ता 1 ली ते 7 वी च्या शाळांमध्ये सुरु करण्यात आलेल्या 8 वी च्या वर्गांबाबत शासन स्तरावरुन स्पष्ट आदेश निर्गमित करण्यात यावेत.*

*11. विना अनुदादीत तुकड्यांवर काम करणाऱ्या शिक्षकांना उदरनिर्वाह भत्ता देण्यात यावा.*


*12. डाँ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त आयोजित केलेल्या आँनलाईन रंगभरण स्पर्धेला राज्भरातील विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे.

*13. शिवराज्याभिषेक दिना निमित्ताने राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षक परीषदे मार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या आँनलाईन वक्तृत्व स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. बैठकित डाँ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदचे राष्ट्रीय अध्यक्ष पप्पू पाटील भोयर ,प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण नेव्हल ,महासचिव सुनिल चव्हाण,कार्याध्यक्ष दयानंद जाधव,कोषाध्यक्ष प्रभाकर पराड, शांताराम जळते,सतिष काळे,प्रा.शेषराव येलेकर,अंबादास रेडे,डाँ.विलास पाटील,राजकिरण चव्हाण ,विनोद आगलावे,शामराव लवांडे,अजित पाटील,अमोल आतकरे,वसंत नेरकर,राजेंद्र भोयर,शालिक बोरसे,बंडू डाखरे,प्रल्हाद कर्हाळे,देवेंद्र टाले,ज्ञानेश्वर गायकवाड ,प्रेमचंद आहिरराव,आर.आर.वांडेकर,के.डी.वाघ,विठ्ठल घायाळ,अनंत* *मिटकरी,भास्कर शिंदे,पंजाब दांदले, संजय निंबाळकर ,संजीव शिंदे,सुरेंद्र बनसिगे, हर्षा वाघमारे,नंदा वाळके,पिर्या इंगळे,पुष्प्पा कोंडलवर, प्रवीण मेश्राम, गजानन कोंगरे भास्कर कढवणे,अनिल घोरपडे,वल्लभ गाढे,राजेश भोसले, बलवंत घोगरे,देविदास शिंदे,राजेंद्र चव्हाण,निलेश पाटील ,बंडू गाडेकर,राजेश वैद्य, कुंदन पाटील,रत्नाकर मुंगल ,दिलीप गायकवाड,अशोक कुटे,अशोक ढोले,अनिल खेमडे,आनंद पिंगळे ,हरिभाऊ लोखडे , भालचंद्र कोकाटे, विनोद आगलावे,रमेश पाटील,मनोजकुमार रणदिवे,निलेश पाटील,आनिल बोधे,डी.के. देसाई, गणेश उढाण, विजय कर्हाळे ,मधुकर मोरे,किरण पाटील, शंकर काळे,आनिल भुसारी,राजकुमार शिंगनजुडे, सुरेश दास, बी.एन.पवार,अजित कणसे,सुनिल चौधरी, अजित वाकसे, सुरेंद्र बालशिंगे, शिवशंकर स्वामी,नितीन पवार,संगिता निंबाळकर,परमेश्वर वाघ,सुनिल मनवर,भारत पाटील, रमेश पाटेकर, प्रविण पंडीत, शिवाजी मुळे, बाळासाहेब यादव, प्रविण ठोंबरे, विनोद डाखोरे, संजय आम्बरे, राम गायकवाड आदीं सहभागी झाले होते.

                        *आपला विश्वासू*

                                                                                                                                        *संजय निंबाळकर*
*नागपूर विभागीय अध्यक्ष*

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.