माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांचा उपक्रम
नागपूर/अरूण कराळे(खबरबात):
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ग्रामीण भागातील मजूर वर्गावर मोठे संकट निर्माण झाले.अश्या मजूर वर्गास स्व.देवकीबाई बंग यांच्या स्मृती प्रित्यर्थ कान्होलीबारा येथील स्व.देवकीबाई बंग इंग्लिश मिडीयम हायस्कुल येथे शेकडो कुटूंबाना धान्य वाटप करण्यात आले.
कोरोना विषाणू संसर्ग वाढू नये म्हणून शासनाने संपूर्ण टाळेबंदी केली त्यामुळे रोजगार बंद झाले. आणि हातावर पोट असणाऱ्या अनेक लोकांना कुटुंबाचे उदरनिर्वाह चालविणे कठीण झाले. त्यातच ग्रामीण भागात शेती हाच मुख्य व्यवसाय असल्याने शेतमजुरीवर आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या शेतमजूर वर्गावर मोठे संकट निर्माण झाले.बाजारपेठा बंद असल्याने शेतकरी वर्गही हवालदिल झाला नेमकी हीच बाबा ओळखून माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांनी आई स्व.देवकीबाई गोपीकिसन बंग यांच्या स्मृती प्रित्यर्थ कान्होलीबारा,खडकी, गांधी खापरी, घोडेघाट, आजणगाव, धोकार्डा, सावळी,बीबी, लखमापूर, पिपलधरा, भीमनगर आदी गावातील शेकडो गरजूं कुटुंबाना नित्याउपयोगी वस्तूच्या किट चे वाटप करण्यात आले. त्यात तांदूळ, कणिक, तूर डाळ, गोड तेल, मिरची पावडर, हळद पावडर, मीठ, मसाला, साबन आदीचा समावेश आहे.
सामाजिक अंतर ठेऊन, शासनाच्या नियमांचे पालन करून स्व.देवकीबाई बंग शाळेच्या प्रागंणावर वाटप करण्यात आले.
यावेळी माजी मंत्री रमेशचंद्र बंग, महेश बंग, कान्होलीबाराचे उपसरपंच प्रशांत गव्हाळे, हनुमान दुधबलळे, नामदेवराव येलूरे वामनराव देवतळे, संतोष गव्हाळे,ताराचंद गेडाम , युवराज उमरेडकर आदी उपस्थित होते.
या कार्याला यशस्वी करण्यासाठी मुख्यध्यापक पुरुषोत्तम काटोले, संदीप कैलूके, नितीन तुपेकर,विलास पवार,अशलेशा मानकर, स्वाती घांगरेकर, हेमलता बुधबावरे, ममता भगत, गणेश भोंगाडे, केतन निखाडे, मोनाली खडसे, बाबा चंदनखेडे आदी सह शाळेतील शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.