मुख्याधिकारी यांना व्यावसायीकांचे निवेदन
नागपूर/ अरूण कराळे (खबरबात)
कोरोनाच्या विषाणूमुळे सध्या संचारबंदीआहे . परंतू या संचारबंदीतही नागपूर महानगरपालीका तर्फे काही व्यवसाय करण्यावर शिथीलथा दिली आहे . हाच नियम वाडी नगरपरिषद क्षेत्रातील व्यवसाय करणाऱ्या दुकानदारासाठी तयार करावा अशी मागणी कपडा व्यावसायीक तथा युवक काँग्रेसचे हिंगणा विधानसभा अध्यक्ष अश्विन बैस यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचे वाडी शहर अध्यक्ष शैलेश थोराने ,काँग्रेस कमेटी तालुका अध्यक्ष प्रकाश कोकाटे,गणेश बावणे, योगेश कुमकुमवार यांच्या उपास्थितीत मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांना निवेदनाद्वारे दिली. आजपर्यत सर्व दुकानदार व्यवसायीकांनी आपले दुकान बंद ठेऊन नगरपरिषद व शासनाला सहकार्य केले आहे.
आनंदाची बाब म्हणजे सर्वांच्या सहकार्याने कोरोना विषाणूच्या आजाराच्या फैलावापासून वाडी सुरक्षित राहिली आहे .या कालावधीला दोन महिने पूर्ण होत आले आहे.व्यवसाय पूर्णपणे बंद असल्यामुळे व्यावसायिकांचे सपूंर्ण आर्थिक व पारिवारिक ,व्यावसायिक बजट व नियोजन बिघडले आहे.
केंद्र व राज्य शासनाने ही गंभीर स्थिती लक्षात घेता काही अंशी लॉकडाऊन शिथिल करण्याचे निर्देश व त्या अनुषंगाने अधिकारी स्तरावर नियोजन बद्ध कार्यवाही सुरू करून दिलासा देण्याचा प्रयत्न देखील सुरू झाला आहे मनपा नागपूरचे आयुक्त यांनी आपल्या अधिकाराचा योग्य वापर करीत मनपा क्षेत्रात अटी व निकषांच्या आधारावर लॉकडाऊन मध्ये शिथिलता घोषित करून काही प्रमाणात व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली आहे.
वाडीतील व्यावसायिक ही या आधारावर आपल्याकडे आशेने बघत आहे.आपणही आपल्या वाडी क्षेत्रात काही प्रमाणात अटी व निकष जारी करून व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्याची कार्यवाही करून संकटात असलेली व्यवसायीकांना दिलासा द्यावा .वाडीतील व्यवसायीका तर्फे आपणास शाश्वती देण्यात येत आहे की.
आपल्या सूचना व नियमांचे व्यवसायीक निश्चित पालन करतील,नियमभंग दिसल्यास सबंधितांवर आपण योग्य ती कडक कार्यवाही करावी.असेही निवेदनातून स्पष्ट केले .या निवेदनाची प्रतिलीपी जिल्हाधिकारी राजेंद्र ठाकरे ,पालकमंत्री डॉ. नितीन राऊत ,युवक व क्रिडा पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार ,काँग्रेस पक्षाचे नागपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनाही देण्यात आले.