जुन्नर तालुक्यातील तालुक्यातील १३० संशयितांची स्वँब तपासणी पूर्ण तर १० रिपोर्ट प्रलंबित
जांभूळपट, सावरगाव, मांजरवाडी खिलारवाडी व आता पारुंडे ही ठिकाणे प्रतिबंध क्षेत्र म्हणून घोषित
जुन्नर /आनंद कांबळे
जुन्नर तालुक्यामध्ये एकूण कोरोना रुग्णांची संख्या 13 एवढी झाली असून यापैकी एक रुग्ण उपचारानंतर बरा झाला असल्याची माहिती जुन्नरचे तहसीलदार हनुमंत कोळेकर यांनी दिली.
यामध्ये धोलवड – ३, सावरगाव-५, मांजरवाडी -१, खिलारवाडी १ व पारुंडे 2 याप्रमाणे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. डिंगोरे येथील एक रुग्ण बरा झाला आहे. कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचे ट्रेसिंग करून हाय रिस्क कॉन्टॅक्ट व लो रिस्क कॉन्टॅक्ट याप्रमाणे वर्गीकरण केले जात आहे. हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील संशयित रुग्णांना श्री क्षेत्र लेण्याद्री येथील भक्त निवास भाग क्रमांक दोन येथील कोविड केअर सेंटरमध्ये तपासणीसाठी ऍडमिट केले आहे. सावरगाव येथील हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील आठ रुग्णांची चाचणी अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.
धोलवड येथील जांभूळपट, सावरगाव, मांजरवाडी पारुंडे व खिलारवाडी याठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहेत. या प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये कलम १४४ नुसार लोकांची हालचाल पूर्णतः बंद केली आहे. या क्षेत्रांची नाकाबंदी केली असून एकूण ४४ पथकामार्फत दररोज सर्वेक्षण करण्यात येत आहे. आत्तापर्यंत तालुक्यातील १५१ संशयित रुग्णांचे स्वँब घेतले असून १३ पॉझिटिव्ह तर १३० अहवाल प्राप्त झालेले आहेत. १० जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. सर्व नागरिकांना तालुका प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे की, सोशल डिस्टन्स ठेवावे.