गजेंद्र डोंगरे/कोंढाळी प्रतिनिधी
येथून 13 की मी अंतरावरील शिवा-सांवगा येथील इकॉनॉमिक्स स्फोटक कँपनीत स्वराक्षण दलाला स्फोटक पुरविण्याचे काम करते आज या कपनीत आज 5 वाजता सेल्फ फिलिंग D-5 प्लान्ट मध्ये पूर्ण 1200 डेनेटोटर राउंडचा स्फोट झालाअसून स्फोटक विखुरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यात काम करणाऱ्या कामगारांना तात्काळ नागपूर येथे खाजगी दवाखान्यात रवाना करण्यात आले असता यात 1 एकाचा नागपूर उपचार दरम्यान मृत्यू झाला असून 2 गभीर जखमी असून मृत्यशी झुंज देत आहे तर 3 किरकोड जखमीं असून आशापाच लोकांवर उपचार खाजगी दवाखाना नागपूर येथे उपचार सुरू आहे.
प्राप्त माहिती नुसार शिवा-सावगा इकॉनॉमिक्स स्फोटक कंपनीत डीटेनोटर D5 सेल्फफिलिंग प्लान्ट मध्ये डेटोनेटर फीलिंग करीत असताना स्फोट झाला त्यात काम करणारे 17 पैकी सहा कामगार पैकी प्रिंतेश जैथगुडे 20 रा सांवगा हे नागपूरला उपचार दरम्यान मृत्यू झाला असून भूषण देवारे ,23 शिवा दत्थू बागडे51 शिवा हे गंभीर जखमी झाले तर भूषण पुंड 23 रा बाजारगाव व मुकेश धुर्वे,21 सांवगा निलेश उके 26 मुरली जखमी असून राठी हॉस्पिटल धंतोली येथे उपचार सुरू आहे घटनेची माहिती कोंढाळी पोलिसांना मिळताच ठाणेदार शयाम गव्हाणे पोलीस उपविभागीय अधिकारी नागेश जाधव घटनास्थळी पोहचून लोकांना शांत केले या दरम्यान घटनेचे गाभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक राकेश ओला त्याच बरोबर साहाय्यक जिल्हा पोलीस अधिकारी मोनिका राऊत यांनी घटना स्थळाला भेट देऊन घटनेची माहिती घेतली या दरम्यान या भागाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते जि प सदस्य सलील देशमुख यांनी सुद्धा घटना स्थळी भेट दिली तेव्हा मृतक व जखमी च्य कुटूंबाला योग्य मोबदला देण्याची मागणी केली या वेळी जि प सदस्य चंद्रशेखर कोल्हे ,माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले कृ उ बा समिती सभापती तरकेश्वर शेळके यांनी भेट दिली