नागपूर शांती नगर कोरोना संक्रमण
कोंढाळी दुधाळा येथे एक कोरोना पाॅजेटिव्हची खातरजमा
नागपूर/ अरूण कराळे ( खबरबात)
नागपूर-अमरावती महामार्गावर नागपूर नागपूर पासून 47 कि.मी. अंतरावर कोंढाळी नजीकच्या दुधाळा ग्रामपंचायत क्षेत्रात कोरोना संक्रमणाचा एक रूग्ण पॉजेटिव्ह आढळून आल्याने कोंढाळी दुधाळा येथे एकच खळबळ माजली आहे. दुधाळा येथे एक कोरोना रूग्ण पॉजेटिव्ह आढळून आल्याचे काटोलचे उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंमरकर
आणि कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. सुनील येरमल यांनी सांगितले आहे. ही घटना शांती नगर कनेक्शन असल्याचे सांगितले जाते.
मिळालेल्या माहितीनुसार संबंधित कुटुंब एक धर्म प्रचार कार्यात नागपूरच्या शांती नगर येथे गेले. शनिवार 16 मे रोजी नागपूर येथून दुधाळा आपल्या गावी परत आले . हे शांती नगर भागातून आल्याचे ग्रामपंचायत नेपोलीस स्टेशन व आरोग्य विभागाला माहिती दिली ही माहिती समजताच कोंढाळी पोलिस स्टेशन अधिकारी श्याम गव्हाने कोंढाळी
प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. सुनील येरमल यांनी सोमवार 18 मे च्या दुपारी या कुटुंबातील पाच सदस्यांना संस्थागत विलगीकरना करीता नागपुराला पाठवले. त्यात मुलीला खोकला असल्याने लगेच तपासणी केली तपासणी दरम्यान पाच जणांपैकी एक लहान 9 वर्षाच्या बालिकाच्या चाचणीचा अहवाल पॉजेटिव्ह केस असल्याचे माहिती मिळताच नागपूर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले.
आणि काटोलचे एचडीओ शंतक उमरकर तहसीलदार अजय चरडे ,बीडीओ,सुनील साने नायब तहसीलदार निलेश कदम ,तालुका आरोग्य अधिकारी शशांक व्यवहारे ,कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी डॉ. सुनील येरमल कोंढाळीचे ठाणेदार श्याम गव्हाणे, ग्राम सचिव सह यांच्या पथकांची तपासणी पथक ग्रामपंचायत दुधाळा पोहोचून दुधाळा भाग सील करण्याच्या उपाययोजना केल्या आहेत.
दुधाळा ग्रामपंचायतीच्या अर्ध्या भागाला सील असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर यांनी दिली.त्याच बरोबर कोंढाळी जनतेने जनता कर्पू पाळावा व कोणीही घाबरून जाऊ नये असे आव्हान केले त्याचबरोबर या धर्म उपदेशकांचा आणखी कुठे कुठे संबध आले. हे तपासणी सुरू करण्यात आली असल्याचे डॉ. सुनील येरमल यांनी सांगितले आहे.