Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, मे १४, २०२०

चंद्रपूर:त्या कोरोनाबाधित युवतीच्या परीवारातील ईतर संशयितांचे नमुने निगेटिव्ह

चंद्रपूर(खबरबात):
13 मे रोजी चंद्रपुरात दुसरया कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झाली होती. त्यानंतर एकाच खळबळ उडाली होती, प्रशासनाने दक्षता घेत तिच्या   आई-वडील आणि काकू यांच्या नमुने काल तपासणीसाठी पाठवले होते.त्यांचा रिपोर्ट आता निगेटिव्ह प्राप्त झाला आहे. हि युवती ज्या परिसरात राहते तो बिनबा गेट परिसर सील करण्यात आला आहे. इतर संशियीतांवर प्रशासन नजर ठेवून आहे. एकूण  ५ लोकांचे नमुने निगेटिव्ह आले असल्याची माहिती आहे.

 चंद्रपूर जिल्ह्यामध्ये १३ मे रोजी आढळलेल्या दुसऱ्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या सानिध्यातील अती जोखमीच्या ५ नातेवाईकांपैकी पाचही जणांचे स्वब अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर २ मे रोजी पॉझिटिव्ह आढळलेला रुग्ण सध्या नागपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
      जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत यांनी जारी केलेल्या मेडिकल बुलेटीनमध्ये बिनबा भागातील पॉझिटिव्ह रुग्णाच्या अति जवळच्या कुटुंबातील व्यक्तींचे काल घेण्यात आलेले स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात बिनबा गेट जवळ चंद्रपूर येथील एक महिला संक्रमित असल्याचे आढळून आले होते. सदरील रुग्ण विलगीकरण कक्ष चंद्रपूर येथे भरती आहे. १३ मे रोजी या व्यक्तीच्या संपर्कातील पाच रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले होते. या ५ लोकांचे प्रतिक्षेत असणारे स्वॅप नमुने सायंकाळी पाच वाजता निगेटिव्ह आल्याचे स्पष्टीकरण जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिले आहे.
     बिनबा गेट परिसरातील नव्या रुग्णाच्या संपर्कातील दहा व्यक्तींची नोंद घेण्यात आली आहे. त्यापैकी ५ लोकांचे स्वॅब घेण्यात आले होते. ते निगेटिव्ह आले आहेत.बिनबा गेट  परिसरातील रूग्ण देखील चंद्रपूर येथे विलगीकरण कक्षात दाखल असून त्याची प्रकृती स्थिर आहे. या परिसरातील एकूण १९० घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. याठिकाणी एकूण ७२८नागरिकांच्या आरोग्याची तपासणी व माहिती घेण्यात येत आहे.
     तर २ मे रोजी आढळलेल्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याच्या संपर्कातील आत्तापर्यंत घेण्यात आलेल्या ५५ नागरिकांच्या नमुन्यांपैकी ५३ नमुने निगेटिव्ह आले आहेत. २ नमुने प्रतीक्षेत आहे. या परिसरातील २ हजार १५२ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले असून ८ हजार ५४० नागरिकांच्या प्रकृतीची तपासणी दोन तारखेपासून सुरू आहे. आतापर्यंत कोणत्याही गंभीर किंवा संशयित रुग्ण या परिसरात आढळलेला नाही.
       संपूर्ण जिल्ह्याची आतापर्यंतची कोविड-१९ ची सर्वसाधारण माहिती पुढील प्रमाणे आहे. आत्तापर्यंत स्वॅब नमुने घेण्यात आलेल्या नागरिकांची संख्या ३०० आहे. यापैकी दोन नागरिक पॉझिटीव्ह निघाले असून २७२ नागरिक निगेटीव्ह आहे.२६ नागरिकांचा अहवाल प्रतीक्षेत आहे.
      जिल्ह्यात आतापर्यंत तालुकास्तरावर २१ ५ तर चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये ११७असे एकूण ३३२ नागरिक संस्थात्मक अलगीकरण कक्षात आहे.

     चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गृह अलगीकरण करण्यात आलेल्या आत्तापर्यंतच्या व्यक्तींची संख्या ५७ हजार ८१४ एव्हढी आहे. यापैकी ४० हजार ६२ नागरीकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले आहे. १७ हजार ७५२ नागरिकांचे सध्या गृह अलगीकरण सुरू आहे.





SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.