अवैध रेतीची लाँकडाऊनमध्ये वाहतूक
गौतम धोटे/आवारपूर
कोरपना जवळील असलेल्या पैनगंगा नदीवर तुळशी घाटावर रेती तस्करी होत असल्याच्या अनेक तक्रारी होऊन सुद्धा रेती तस्करांच्या मुजोरी ने महसूल विभागाच्या हातावर तुरी देत अविरत दोन महिन्यापासून तुळशी येथून हजारो ब्रास रेती तस्करी झाली. ट्रॉलीवर बसून असताना तांबडी शिवारात ट्रॅक्टर पलटी झाल्यामुळे अनिल परचाके, देवराव नैताम यांच्या रेती खाली दाबून जागीच मृत्यू झाला. रामदास पुसनाके यांचा हात तुटल्याने त्यांना जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले.
अनेक वेळा रस्ता बंद करून आळा घालण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. पत्रकारांवर हल्ले करण्यात आले. मात्र तुळशी येथील चोरी सक्रिय असन्यामध्ये पदाधिकारी व नगरसेवकांच्या हात असल्याचे उघड झाले आहे. दिनांक 13/05 ला रात्री दोन वाजता दरम्यान नदीमध्ये सहा ट्रॅक्टर रेती भरून निघाल्याची जखमी संभू मडावी यांनी माहिती दिली. घटनेच्या वेळी तांबाडी येथील एक ट्रॅक्टर पुढे होते तर विजय तेलंग या नगरसेवकाचे गाडीचा ड्रायव्हर दिनेश कन्नाके व धानोरा येथील रेती भराई कामगार म्हणून रामदास पुसणाके,अनिल परचाके, देवराव नैताम, संभा मडावी रेती ट्रॉलीवर बसून असताना तांबडी शिवारात ट्रॅक्टर पलटी झाल्यामुळे अनिल परचाके, देवराव नैताम यांच्या रेती खाली दाबून जागीच मृत्यू झाला. रामदास पुसनाके यांचा हात तुटल्याने त्यांना जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले.
शंभू मडावी त्यांच्या कमरेला मार असून ते जखमी आहे. सर्व कामगार तरुण असल्याने हळहळ व्यक्त होत आहे. ट्रॅक्टर क्रमांक MH-34 L- 94 58 पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. सर्व रेती तस्करांनी महसूल विभागाच्या मुसक्या आवळल्या का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मूतकाचे शव विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे ठेवण्यात आले आहे. मृतांच्या नातेवाईकांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गाडीमालकावर कार्यवाही करावी व नुकसान भरपाई दिल्याशिवाय डेथबॉडी उचलणार नाही अशी भूमिका महादेव मडावी व नातेवाइकांनी घेतल्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.