नागपूर/अरूण कराळे(खबरबात):
दवलामेटी ग्रामपंचायतच्या वतीने ज्यांची नावे देशात कुठेही रेशनकार्डमध्ये नाही तसेच लाॅकडाऊनमुळे गावात अडकलेल्या बाहेरील गरजू कुटुंबांना प्रत्येकी दहा किलो तांदूळ , दहा किलो गहू, प्रत्येकी एक किलो सोयाबीन तेल, तूरडाळ, चनाडाळ आणि साखर तसेच एक पाव चहापत्ती इत्यादी जीवनावश्यक वस्तूंची तयार केलेली मोफत राशन किट ९५९ गरजवंतांना आमदार समीर मेघे यांच्या हस्ते सरपंच आनंदीताई कपनीचोर ,उपसरपंच गजानन रामेकर ,ग्राम विकास अधिकारी विष्णू पोटभरे, पं. स. सभापती रेखा वरठी , जि. प .ममता धोपटे ,पं.स. सदस्य सुधीर करंजीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वाटप करण्यात आले.
शासनस्तरावर आयोजित करण्यात आलेले धान्यवाटप कार्यक्रम सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत सतत चार दिवस करण्यात आले .यावेळी ग्रां. प. सदस्य नितीन अडसड ,प्रशांत केवटे , आरती ढोके,कमल पेंदाम , कल्पना गवई ,रागीनी तांडेकर ,सवीता खोब्रागडे प्रामुख्याने उपस्थित होते .