अर्जुनी मोरगाव तहसीलदारांचा दणका
संजीव बडोले/नवेगावबांध.
नवेगावबांध:- शिवालया कंट्रक्शन कंपनी लाखनी ने टीपीवरील वेळेत खोडतोड करून अवैध 4 ब्रास मुरुमाची वाहतूक केल्याप्रकरणी अर्जुनी मोरचे तहसीलदार विनोद मेश्राम यांनी 2 लाख 18 हजार 400 रुपये दंड ठोठावले आहे.
प्राप्त माहिती नुसार, शिवालया कन्ट्रक्शन कंपनी लाखनी च्या वतीने अतुल सुधाकर डोर्लीकर राहणार तालुका लाखणी जिल्हा भंडारा हल्ली मुक्काम नवेगावबांध तालुका अर्जुनी मोरगाव यांनी मौजा भुरसीटोला तहसिल साजा क्रमांक 03 येथील खाजगी जमीन गट क्रमांक06 आराजी 0.50 हेक्टर आर जागेमधून 1000 ब्रास मुरूम उत्खनन करून वाहतूक करण्याचा परवानगी उपविभागीय अधिकारी अर्जुनी मोरगाव यांच्या आदेशान्वये वाहतूक करण्यास परवाना काढला आहे. अवैध गौण खनिज तपासणी नायब तहसीलदार मुनेश्वर गेडाम हे करीत असताना,त्यांच्या जप्ती नाम्या नुसार शिवालया कंट्रक्शन कंपनीचे अतुल सुधाकर डोर्लीकर यांच्या मालकीचे टिप्पर क्रमांक ए एस, डी 1, एफसी 926 मध्ये टिप्पर चालक लालदेव शिवालया कन्ट्रक्शन कंपनी कॅम्प नवेगाव बांध तालुका अर्जुनी मोरगाव यांनी दिनांक 24 मे 2020 रोजी सायंकाळी 4.50 वाजता मौजा मुंगली येथे डीपीवर वेळेची खोडतोड करून 4 ब्रास मुरूम अवैधरित्या वाहतूक करताना आढळले. सदर वाहन जप्त करून तहसील कार्यालय अर्जुनी मोरगाव येथे ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48 7 अन्वये प्राप्त अधिकाराचा उपयोग करून महाराष्ट्र शासन राजपत्र क्रमांक 18 दिनांक 12 जानेवारी 2018 नुसार कलम 42 (7) अन्वयेअवैधरित्या टिप्पर मधून गौण खनिज वाहतूक केली, म्हणून अर्जुनी मोरगाव चे तहसीलदार विनोद मेश्राम यांनी 2 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा अध्यादेश 2015 च्या कलम 48 (7) याबाबत जिल्हाधिकारी गोंदिया यांचे कार्यालय परिपत्रक 11 नोव्हेंबर 2016 अन्वये निर्गमित केलेल्या खनिजाच्या बाजार भावाच्या पाच पट दंडाची रक्कम व व स्वामित्व धन याप्रमाणे चार ब्रास मुरमाचे बाजार भाव 900 रुपये प्रमाणे पाचपट 18000 रुपये अधिक स्वामित्वधन 400 असे एकूण 2 लाख 18 हजार 400 रुपयांचा दंड. डीपी व वेळेत खोडतोड करून व चार ब्रास मुरमाची अवैध वाहतूक केल्या प्रकरणी दंडाची रक्कम ठोठावली आहे. सदर दंडाची रक्कम शासन जमा करण्याचे शिवालया कंट्रक्शन कंपनीचे अतुल सुधाकर डोर्लीकर हल्ली मुक्काम नवेगावबांध यांना 27 मे 2020 रोजी आदेशित केले आहे.