राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, खेळ व युवा कल्याण मंत्री ना. श्री. सुनील केदार यांच्या हस्ते अन्नदान करण्यात आले. |
नागपूर(खबरबात):
कोरोनाच्या संसर्गामुळे गोरगरीब-मजुरांना लॉकडाउनमध्ये अनेक अडचणी येत असतांना मानवच दुस-या मानवाच्या मदतीकरिता माणुसकीच्या नात्याने मुढे येत आहे, आणि हीच आपल्या देशाची खरी शक्ती आहे. आम्ही सर्वजण एकत्रितपणे कोरोनाला पराभूत करु अशी भावना सर्वत्र झाली असल्याचे मत राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, खेळ व युवा कल्याण मंत्री ना. श्री. सुनील केदार यांनी आज व्यक्त केले.
महावितरणचे अभियंते, अधिकारी व कर्मचारी, लायन्स क्लब आणि पब्लीक रिलेशन्स सोसायटी ऑफ़ इंडीयाच्या (पीआरएसआय) नागपूर चॅप्टर सहकार्याने मागिल एक महिन्यापासून नियमितपणे तब्बल दोनशे लोकांना शिजविलेले अन्न दररोज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. शनिवार (दि. 23 मे) रोजी आग्याराम देवी, म्हाडा कॉलनी येथे परिसरातील मजूर, रोजंदारी कर्मचारी, त्यांची मुले यांच्याकरिता आयोजित अन्नदान कार्यक्रमाप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार श्री. ओमप्रकाश सोनी, लायन्स क्लबचे श्री. प्रसन्न श्रीवास्तव, श्री. विज श्री कुंडू, पीआरएसआयच्या नागपूर चॅप्टरचे अध्यक्ष श्री एस.पी.सिंह, महावितरणचे उपमुख्य जनसंपर्क अधिकारी श्री योगेश विटणकर, वेकोलीचे वरिष्ठ अधिकारी डॉ. मनोज कुमार यांचेसह महावितरणचे अभियंते व लायन्स क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.