Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मे ०८, २०२०

सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्या "त्या" वेब न्युज पोर्टलवर चंद्रपुरात गुन्हा दाखल


Fake News विरुद्ध कायदेशिर कारवाईचे पोलीस अधीक्षक यांचे निर्देश


चंद्रपूर/खबरबात
नांदेड येथील पथक तीन संशयित नागरीकांना घेवुन पुढील तपासणीसाठी नांदेड येथे रवाना झाले. या घटनेची कोणतीही सत्यता न पडताळता जनतेमध्ये संभ्रम व भिती निर्माण होईल, अशी बातमी  खबरकट्टा या वेब न्युज पोर्टलवर काल दिनांक ०७ मे २०२० रोजी दुपारी 'आताची ब्रेकींग न्युज: चंद्रपुरात सापडले तिन कोरोना पॉझीटीव्ह' या मथळ्याखाली  प्रसारित करण्यात आली. खबरकट्टा न्युज पोर्टलचे सपांदक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


 दिनांक ०६ मे २०२० रोजी रात्री दरम्यान माणिकगड (गडचांदूर) जिल्हा चंद्रपूर येथे नांदेड येथून आलेल्या तीन नागरिकांना संशयावरुन जिल्हा प्रशासन व पोलीसांचे मदतीने ताब्यात घेतले होते. पोलीस विभाग व कोव्हीड १९ नियंत्रण कक्षच्या मदतीने नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीसांसोबत सपर्क केला असता चंद्रपुर येथील ताब्यात घेतलेले तिन इसमांचे नावे ही नांदेड येथुन पसार झालेल्या इसमांसोबत मिळते जुळते नसल्याची माहीती मिळाली.
पुढील खबरदारी म्हणुन नांदेड येथील पथक तिनही नागरीकांना घेवुन पुढील तपासणी व पडताळणीकामी नांदेड येथे रवाना झाले. या घटनेची कोणतीही सत्यता न पडताळता जनतेमध्ये संभ्रम व भिती निर्माण होईल अशापध्दतीने चंद्रपुर येथील खबरकट्टा या वेब न्युज पोर्टल वर काल दिनांक:०७ मे २०२० रोजी दुपारी दरम्यान 'आताची ब्रेकींग न्युज: चंद्रपुरात सापडले तिन कोरोना पॉझीटीव्ह' या मथळयाखाली बातमी प्रसारीत करण्यात आली. 

या बातमीमुळे चंद्रपुर येथील जनतेमध्ये वब प्रसारमाध्यमाध्ये अफवा पसरुन एकप्रकारे संभ्रमाचे व भितीचे वातावरण निर्माण झाले. कोबीड १९ च्या सदंर्भात अशाप्रकारे चुकीच्या बातम्या/ अफवा पसरवू नये, या करीता शासनाने यापुर्वी वेळोवेळी आदेश निर्गमित केलेले आहेत. तसेच चंद्रपूर पोलीस विभागाने सुध्दा याबाबत वेळोवेळी आवाहन केलेले आहे.

खबरकट्टा वेब न्युज पोर्टल वर प्रसारीत करण्यात आलेल्या या चुकीच्या बातमीकरीता पोलीस स्टेशन राजुरा येथे अपराध क्र. २८५/२०२० कलम १८८, ५०५(१)(ब), ५०५(२) भादंवि सह कलम ५२, ५४ आपत्ती व्यवस्थापन अधिनीयम अन्वये सबंधित न्युज पोर्टलचे सपांदक यांचेविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला असुनकायदेशिर कारवाई करण्यात येत असुन पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहेत.

सर्व नागरीकांना तसेच प्रसार माध्यमांना पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांचेकडुन निर्देशित करण्यात येत आहे की, कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये. त्याचप्रमाणे जनतेमध्ये संभ्रम व भिती निर्माण 'होईल अशाप्रकारे संदेश किंवा माहीती खात्री झाल्याशिवाय प्रसारीत करु नये. असे आढळुन आल्यास किंबा तक्रार प्राप्त झाल्यास कायेदशिर कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना पोलीस अधीक्षक चंद्रपुर यांनी निर्गमित केले आहेत. मात्र चंद्रपूर पोलिस यासंदर्भात समोर आणखी कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले राहणार आहे

याच सोबत काल माणिकगड गडचांदूर वरून जा 3 कोरोना संशयितांना नांदेड पोलिसांनी पोलीस व्हॅनमध्ये बसवून नेले त्यांनी रस्त्यात जाताना गाडीमध्ये बसून असतानाच व्हिडिओ बनवला व सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यांनी आमच्याविरुद्ध बदनामी करणाऱ्या सर्वांवर नांदेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी तक्रार देणार आहे, असे सांगितले आहे. 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.