Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मे २२, २०२०

कोविड-19 महामारीच्‍या अनुषंगाने उदभवलेल्‍या विविध समस्‍यांवर मात करण्‍याच्‍या दृष्‍टीने उपाययोजना कराव्‍या – भाजपाची मागणी




नगराध्यक्ष अहेतेशाम अली आणि बाबाजी भागडे यांच्‍या नेतृत्‍वात भाजपाच्‍या शिष्‍टमंडळाने घेतली तहसीलदार साहेब-यांची भेट

वरोरा/शिरीष उगे : कोविड-19 महामारीच्‍या अनुषंगाने उदभवलेल्‍या विविध समस्‍यांवर मात करण्‍याच्‍या दृष्‍टीने उपाययोजना करण्‍याच्‍या मागणीसाठी नगराध्यक्ष श्री अहेतेशाम अली आणि बाबाजी भागडे यांच्‍या नेतृत्‍वात भाजपाच्‍या शिष्‍टमंडळाने तहसीलदार श्री सचिन गोसावी यांची भेट घेत विविध मागण्‍यांचे निवेदन सादर केले व त्‍यांच्‍याशी चर्चा केली.

महाराष्‍ट्रात कोविड-19 महामारीच्‍या अनुषंगाने अनेक समस्‍या उदभवलेल्‍या आहेत. महाराष्‍ट्रात कोरोनाच्‍या रूग्‍णांची संख्‍या दिवसेंदिवस वाढत आहे. लॉकडाऊनमुळे शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब नागरिक, मध्‍यमवर्गीय, व्‍यापारी सर्वच घटकांना समस्‍यांचा सामना करावा लागत आहे. या समस्‍येवर मात करण्‍याच्‍या दृष्‍टीने विविध उपाययोजना करण्‍याची मागणी या शिष्‍टमंडळाने तहसीलदार-यांच्‍या माध्‍यमातुन मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे यांच्‍याकडे केली आहे.

प्रामुख्‍याने 31 मे पर्यंत राज्‍यातील कापूस खरेदी पूर्ण करावी, प्रत्‍येक केंद्रावर दररोज किमान 150 गाडयांची खरेदी करावी व फरतड कापूस व्‍यापा-यांच्‍या माध्‍यमातुन खरेदी न करता मार्केटींग फेडरेशनच्‍या माध्‍यमातुन खरेदी करत त्‍यासाठी स्‍वतंत्र निधी उपलब्‍ध करावा, अशी मागणी करण्‍यात आली आहे. केंद्र सरकारने प्रत्‍येक शेतक-याच्‍या खात्‍यात थेट 6 हजार रूपये जमा करण्‍याचा निर्णय घेतला आहे. याच धर्तीवर राज्‍य सरकारने सुध्‍दा शेतक-यांच्‍या खात्‍यात थेट 5 हजार रूपये जमा करावे, राज्‍यात पुणे, मुंबई आदी ठिकाणी अडकलेले विद्यार्थी, यात्रेकरू व अन्‍य नागरिकांना स्‍वगावी परत येण्‍यासाठी मोफत एस.टी. बस प्रवासाची सोय उपलब्‍ध करण्‍याचा 9 मे चा शासन निर्णय पूर्ववत लागू करावा, ज्‍यांच्‍याजवळ रेशनकार्ड नाही अशा व्‍यक्‍तींना मोफत रेशन उपलब्‍ध करावे, लॉकडाऊनच्‍या काळातील व पुढील दोन महिन्‍यांच्‍या काळातील विजेचे 200 युनिटपर्यंतचे विज बिल माफ करावे, राज्‍यातील सर्व 13 लाख बांधकाम कामगारांना 5 हजार रूपयांची मदत करावी व रक्‍कम थेट त्‍यांच्‍या खात्‍यात जमा करावी, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना या योजनांच्‍या लाभार्थ्‍यांचे अनुदान त्‍यांना विहीत मुदतीत पोहचावे यासाठी कडक कायद्या करावा व विलंबासाठी जबाबदार अधिका-यांवर कडक कारवाई करावी, विविध योजनांच्‍या माध्‍यमातुन मंजूर विहीरींचे बांधकाम पावसाळयापूर्वी पूर्ण व्‍हावे यासाठी अनुदान थेट शेतक-यांच्‍या खात्‍यात जमा करावे, सन 2019-20 पासून शेतक-यांनी विज कनेक्‍शन मिळण्‍यासाठी डिमांड भरलेली आहे त्‍यांना तात्‍काळ विज कनेक्‍शन द्यावे, विविध योजनांच्‍या माध्‍यमातुन मंजूर घरकुलांची बांधकामे पावसाळयापूर्वी पूर्ण होण्‍याच्‍या दृष्‍टीने तातडीने लाभार्थ्‍यांना निधी उपलब्‍ध करावा, गोरगरीब विद्यार्थ्‍यांना शिक्षण शुल्‍कात सवलत द्यावी, उत्‍तरप्रदेश च्‍या धर्तीवर ऑटोरिक्षा चालक व टॅक्‍सी चालकांना आर्थीक मदत करावी, जिल्‍हा रूग्‍णालये, उपजिल्‍हा रूग्‍णालये, प्राथमिक आरोग्‍य केंद्रे, ग्रामीण रूग्‍णालये, उपकेंद्रे यांचे आधुनिकीकरण व नूतनीकरण करून उत्‍तम आरोग्‍य सेवा द्यावी, बारा बलुतेदारांसाठी आर्थीक पॅकेज घोषीत करावे, ज्‍या शेतक-यांना 31 मार्च पर्यंत कर्जाचा भरणा करणे गरजेचे होते लॉकडाऊनमुळे ते कर्जाची परतफेड करू शकले नाही त्‍यांचे 3 महिन्‍यांचे व्‍याज भरण्‍याचे शासनाने मान्‍य केले होते, परंतु अद्याप शासन निर्णय निर्गमित झालेला नाही तो त्‍वरीत निर्गमित करावा, उज्‍वला गॅस योजनेच्‍या धर्तीवर वनविभागाच्‍या श्‍यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेच्‍या लाभार्थ्‍यांना तीन महिन्‍यांसाठी मोफत गॅस सिलेंडर उपलब्‍ध करून द्यावे, अनेक उद्योगांनी कामगारांचे वेतन दिलेले नाही अशा उद्योगांना तातडीने वेतन प्रदानाबाबत आदेश द्यावेत, भाजीपाला, धान, कापूस, द्राक्ष उत्‍पादक शेतक-यांचे गारपिटीमुळे झालेल्‍या नुकसानाची भरपाई त्‍यांना तातडीने देण्‍यात यावी, दूध उत्‍पादक शेतक-यांना सुध्‍दा आर्थिक मदत करावी, शिवभोजन थाळी च्‍या संख्‍येत वाढ करत 21 लाख शिवभोजन थाळी देत गोरगरीब जनतेला दिलासा द्यावा, स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था अंतर्गत जे भाडेकरू आहेत त्‍यांना तीन महिन्‍याचे घरभाडे माफ करण्‍याच्‍या दृष्‍टीने अधिसूचना काढावी, मास्‍क, सॅनिटायझर, पीपीई किट यावरील स्‍वतःच्‍या हक्‍काचा राज्‍य वस्‍तु व सेवाकर माफ करावा, लद्यु उद्योग, मध्‍यम उद्योग, ग्रामोद्योग, कुटीर उद्योग यांच्‍या समस्‍यांचा आढावा घेवून त्‍यांच्‍यासाठी स्‍वतंत्र आर्थिक पॅकेज जाहीर करावे, आदिवासी समाज बांधवांच्‍या खात्‍यात थेट 5 हजार रूपये जमा करावे, राज्‍यातील सुशिक्षीत बेरोजगारांना 5 हजार रूपये बेरोजगारी भत्‍ता देण्‍यात यावा, पोलिस, डॉक्‍टर्स, आरोग्‍य कर्मचारी, सफाई कर्मचारी यांना विमा संरक्षण कवच देण्‍यात यावे तसेच त्‍यांच्‍यावर हल्‍ले होण्‍याच्‍या घटना रोखण्‍याच्‍या दृष्‍टीने कडक कायदा करावा अशा मागण्‍या या निवेदनाद्वारे करण्‍यात आल्‍या आहेत.

सदर मागण्‍यांबाबत तातडीने शासनाला अवगत करण्‍यात येईल असे आश्‍वासन तहसीलदार श्री सचिन गोसावी यांनी शिष्‍टमंडळाला दिले. या शिष्‍टमंडळात नगराध्यक्ष अहतेशाम अली भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाबाजी भागडे तथा महामंत्री विलास गयनेवार, मधुकर ठाकरे नगरसेवक दिलीप घोरपडे, गुणानंद दुर्गे, मेश्राम, विजय मोकासी, जिल्हा सचिव रवि कष्टी, सरचिटणीस निखिल हिवरकर, सरपंच निलजई राहुल बांदुरकर, मीडिया प्रमुख श्यामजी ठेंगड़ी, प्रवीण उमाटे, जगदीश तोटावार,विलास दारापुरकर, बाळा पाचभाई, अमित आसेकर,शरद कतोरे, गोपाल कतोरे, आतिश बोरा, कादर शेख,अजय निखाड़े यांची प्रामुख्‍याने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.