प्रतिनिधी , विजय खैरनार
गारखेड़ा, ता. २२ : तालुक्यातील राजापूर येथील गोपाळा गोविंदा वाघ यांच्या विहिरीत सात ते आठ फुटांचे धामन जातीचे जुळण विहिरीत असलेचे संजय वाघ यांनी बघीतले व त्यांनी वन विभागाचे वनसेवक पोपट वाघ यांना माहिती दिली व वनसेवक वाघ यांनी नांदगाव येथील सर्प मित्र विजय बडोदे यांना फोन करून बोलावून व एक तासात दोन्ही सर्प सुखरुप विहिरीतुन बाहेर काढले . यावेळी संजय वाघ,विजय वाघ,किरण दराडे, मच्छिंद्र नाईकवाडे, मच्छिंद्र मगर , प्रविण वाघ, पवन नाईकवाडे,रामा वाघ, नितिन गोसावी, साईनाथ वाघ, राजेंद्र वाघ, आदी शेतकर्यांनी मदत केली. विहिरीत गेल्या दोन ते तीन दिवसापूर्वी हे साप होते. सध्या कोरोना मुळे जागोजागी लॉगडाऊन असताना सुद्धा सर्प मित्र वेळेवर पोहचले आणि बघितलं तर विहीर सत्तर फूट खोल होती त्यांनी मोठ्या शिफारसीने दोरीच्या साह्याने विहिरीत उतरून खाली जाऊन हे दोन्ही साप पकडले आणि या सापाची थोडक्यात माहिती दिली हे दोन्ही साप धामण जातीचे आहे यांची लांबी सात ते आठ फूट आहे हे दोघी नर आहे मादी यांच्या आवतीभावती फिरत असते असली माहिती सर्प मित्र विजय बडोदे यांनी दिली. फेब्रुवारी ते जून प्रयन्त धामण जातीचे मिलन काळ असतो. बरेच ठिकाणी या सापाची जुळण दिसायला मिळते हि पूर्णपणे बिनविषारी असते यांची लांबी मोठी असल्यामुळे लोक भीती पोटी हे साप मारले जातात आणि संध्या कडक उन्हाळा असल्याने सर्प हे गारवाचया ठिकाणी फिरत असतात पाणीची कमतरता असल्यामुळे पाण्याच्या शोधात पण आपल्या लोकवस्ती जवळ गारव्यात येऊ लागते लोकांनी साप न मारता सर्पमित्रणा संपर्क करावा अशी माहिती देऊन हे वनविभागात नोंद करून लांब जंगलात पाण्याच्या अवतीभवती सोडण्यात आले.