Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, एप्रिल २२, २०२०

माहे एप्रिल पेड इन मे महीन्याचे वेतन देयके स्वीकारण्याबाबत आदेश देण्याची मागणी

विमाशिसंघाचे शासनास निवेदन
नागपूर : अरूण कराळे:
राज्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल पेड इन मे महीन्याचे वेतन देयके सादर करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने निर्देश देण्यात यावे अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय अध्यक्ष एस.जी.बरडे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री, शालेय शिक्षण मंत्री व शालेय शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव यांचेकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

 शासनाने दिलेल्या आदेशानुसार राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे माहे मार्च पेड इन एप्रिल २०२० चे वेतन टप्प्यानुसार येत्या दोन-तीन दिवसात होणार आहे. या वेतनास खुपच उशीर झाला आहे असे विमाशिसंघाने शासनास पाठविलेल्या निवेदनात नमूद केले आहे. माहे एप्रिल २०२० ची वेतन देयके स्वीकारण्याबाबत निर्देश नसल्यामुळे राज्यातील संबंधित सर्व अधिकारी संभ्रमात आहे. 

त्यामुळे राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांची माहे एप्रिल २०२० चे वेतन विलंबाने होऊ नये याकरिता माहे एप्रिल पेड इन मे २०२० ची वेतन देयके स्वीकारण्याबाबत उचित निर्देश तातडीने देण्यात यावे अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातर्फे करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष माजी आमदार व्ही.यू. डायगव्हाणे, महाराष्ट्राचे शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक यांना पाठविण्यात आली आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.