रब्बी हंगामातील धान पिकांचे बरेच नुकसान
संजीव बडोले/नवेगावबांध
दिनांक 28 एप्रिल 2020
नवेगावबांध:-अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव,नवनीतपुर, येथे पुन्हा दिनांक 27 एप्रिल ला वादळी वाऱ्यासह गरपीट झाली.तसेच केशोरी परिसरात अरततोंडी ,परसटोला येथेही गरपीटीसह अवकाळी पाऊस आल्याने रब्बी हंगामातील धान पिकांचे 60 ते 70 टक्के नुकसान झाल्याची माहिती आहे. नुकसानीची पाहनी पंचनामे प्रशासनाकडून करावे ही, मागणी माजी बांधकामं सभापती प्रकाश गहाणे यांनी तहसीलदार ,उपविभागीय अधिकारी, यांना फोनवर बोलून मागणी केली आहे.केशोरी गावात वादळासह गारांचा पाऊस धानाला एकही लोंब शिल्लक राहिले नाही.
27 एप्रिल रोज सोमवारी सायंकाळी केसोरी परिसरात वादळी वारा व गारपिटीने रब्बी धानाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच महागाव येथे घरावरील कवेलूचे नुकसान व टिनाचे शेड उडाले आहेत. परिसरातील केशोरी, पुष्पनगर,कनेरी, गवर्रा, परसटोला-अरततोंडी ईळदा राजोली ही गावे बाधीत झाली आहेत. महागाव, नवनीतपूर परिसरात वादळ वारा व गारपीट सह आलेल्या पावसाने रब्बी हंगामातील धान पिकाचे बरेच नुकसान केले आहे. यापूर्वी 3 एप्रिल ला महागाव येथे आलेल्या अवकाळी पावसाने असेच थैमान घातले होते. अनेक घरावरची पत्रे उडाली होती. झाडे पडली होती. बीएसएनएल टावर चे प्लेट पडल्या होत्या. तर एक महिला जखमी झाली होती. आज पुन्हा महागाव व नवनीतपूर येथे सायंकाळी 5.30 वाजता वादळ वारा, विजांचा कडकडाट व गारपीट सह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. महागाव येथील काही घरांची पत्रे उडाल्याची माहिती आहे. मात्र जीवित हानी टळली. यात रब्बी हंगामातील पिकांचे मात्र खूप मोठे नुकसान झालेल आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नूकसान भरपाई मिळऊन देण्यात यावी. अशी मागणी महागाव ,नवनीतपुर,अरततोंडी ग्रामवासियांनी केली आहे.