
वरोरा :
देशात लॉकडाउन आहे. त्यामुळे गोरगरीबांचे मोठे हाल होत आहे. गोरगरीबांवर उपासमारीची पाळी येऊ नये, यासाठी मागील आठवड्यात खासदार बाळू धानोरकर यांनी वरोèयात शिवभोजन थाळीचे केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत येथे शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी खासदार बाळू धानोरकर आणि आमदार प्रतिभा धानोरकर यांची उपस्थिती होती.
करिम पठाण या वयोवृद्ध मजुराच्या हस्ते शिवभोजन केंद्राचे उद्घाटन सुरू करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष अहतेश्याम अली, माजी नगराध्यक्ष विलास टिपले, गजानन मेश्राम, प्रमोद मगरे, आसिफ रज्जा, सुभाष दंडले, इकबाल शेख यांची उपस्थिती होती. वरोरा- भद्रावती विधानसभा क्षेत्रातील भद्रावती येथे शिवभोजन केंद्र सुरू करणार असल्याचे आमदार प्रतिभा धानोरकर यांनी सांगितले.