दोन चेक पोस्टला भेट, सुरक्षा रामभरोसे
चंद्रपुर/प्रतिनिधी:
प्रशासनाच्या कडेकोड उपायोजना पाहुन चंद्रपूरात कोरानाचा शिरकाव होणार नाही असा चंद्रपूकरांचा विश्वास आहे. त्यामुळे चंद्रपूरकर अडचणींचा सामना करत प्रशासनाला सहकार्य करत आहे. प्रशासनही शहरात सक्तीने उपायोजना करत आहे.
मात्र जिल्ह्याच्या सिमेवरुन चंद्रपूरात येणा-या मार्गावरील चेक पोस्टवरील परिस्थिती चंद्रपूरकरांच्या डोळयात धूड झोकणारी असल्याचे आमदार जोरगेवार यांनी म्हटले असून आज त्यांनी चंद्रपूर जिल्हात येणा-या महामार्गावरील घुग्घूस - वणी व नकोडा - मुंगोली येथील चेक पोस्ट ला भेट देत तेथील व्यवस्थेची पाहणी केली.
यावेळी येथील एका चेक पोस्टवर सहा तर दुस-या चेकपोस्टवर केवळ तिन पोलिस कर्मचारी कर्तव्यावर होते. त्यामूळे येथील ढिसाळ नियोजन पाहुन आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित केले असून पोलिस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांना येथील सुरक्षा वाढविण्याच्या सुचना केल्या आहेत.
कोरोना विषाणूच्या लढयात चंद्रपूरकरांचे सहकार्य कौतुकास्पद आहे. चंद्रपूर शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी व तात्पुरत्या चौक्या लावत रस्त्यावर फिरणा-यांची तपासणी केली जात आहे. प्रशासनाचे हे कडेकोड नियोजन पाहुन चंद्रपूकरांचाही प्रशासनावरील विश्वास द्विगूणीत झाला आहे. मात्र शहरासह जिल्हा बाहेरुन चंद्रपूरात येणा-या मार्गावरही प्रशासनाने लक्ष दिले द्यायला हवे जिल्ह्यात कोरोणाचा एकही रुग्ण नाही.
त्यामूळे चंद्रपूरकरांना चंद्रपूरातील नागरिकांकडून धोका नाही. हा धोका बाहेरुन येणा-या नागरिकांकडून आहे. त्यामूळे या मार्गावर प्रशासनाने विशेष उपायोजना केल्या पाहिजेत असे आमदार किशोर जोरगेवार यांनी या चेकपोस्टच्या भेटी दरम्यान म्हटले आहे. या मार्गावरुन सिमेंट व कोळस्याचे वाहणे चंद्रपूरात ये-जा करत आहे. मात्र या वाहणांचे निर्जन्तुकरण या पोस्टवर केल्या जात नाही. तसेच या वाहणांवरील चालक व वाहकाची योग्य तपासणी केल्या जात नसल्याचेही येथे निदर्शनास आले. केवळ वाहणावर अत्यावश्यक सेवा असा फलक लावला असल्यास कोणतीही तपासणी न करता या वाहणांना सोडल्या जात असल्याचे यावेळी दोन्ही चेकपोस्टवर दिसून आले.
येथून येणाऱ्या वाहनांची कोणतीही नोंद ठेवल्या जात नाही. येथे आरोग्य पथकाची सोय नाही. चंद्रपूरात कोरोणाचा रुग्ण नाही. त्यामूळे आता बाहेरुन चंद्रपूरात येणा-यांवर विशेष लक्ष ठेवण्याची गरज असतांना चेक पोस्टवर सुरु असलेला हा निष्काळजीपणा चंद्रपूकरांसाठी धोका ठरु शकतो असे त्यांनी म्हटले आहे. जटपुरा गेटवर पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे. मात्र खरी गरज असलेल्या सीमा लगतच्या चेकपोस्टवर केवळ तीन ते सहा पोलीसकर्मी ठेवण्यात आले आहे. हे योग्य आहे का असा प्रश्नही त्यांनी उपस्थितीत केला असून प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनावर नाराजी व्यक्त केली आहे.
अनेक नागरिक पोलिस विभागाच्या पासने चंद्रपूर बाहेर ये-जा करत आहे. या सर्व नागरिकांना चंद्रपूरात पोहचताच कोरंटाइन केल जात आहे का असा प्रश्नही आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित केला आहे. चेकपोस्टच्या पाहणी दरम्यान निदर्शनास आलेला हा प्रकार चितांजनक असल्याचेही आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.