जिल्हाधिकाऱ्यासोबत समविचार चर्चा
गौतम धोटे :- आवारपूर /कोरपना :-
सध्याच्या स्थितीत राज्यात कोरोनाचा आकडा वाढतच असून त्याच पार्श्व भूमीवर सरकारने सिमेंट कंपन्या चालू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात बाहेरील प्रवासी ट्रक मधून अवैध प्रवास करून दाखल होऊ शकतात. जिल्ह्यातील सीमेंट उद्योगांना परवानगी दिल्यामुळे जिल्ह्यातील सीमेंट बाहेर जाण्यासाठी वाहतूक चालू होईल त्यामुळे बाहेर ठिकाणांवरून जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून पोलिस प्रशासनाने याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे याकरिता राजुरा विधानसभा क्षेत्राचे मा. आमदार अॅड. संजय धोटे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. विविध मागण्याचे या वेळी
रेशन कार्ड नसणाऱ्या लोकांना लॉकडाऊन च्या पार्श्व भूमीवर जीवन जगण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत असल्यामुळे / त्यामुळे ज्यांच्या कडे रेशन कार्ड नाही त्यांनादेखील .सदर निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्व भूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली असून संचार बंदी दरम्यान क्षेत्रातील कर्जावर कोणतेही व्याज बँकिंग क्षेत्राने आकारू नये त्यांना जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे अशी सूचना शासनामार्फत देण्यात आली होती. परंतु प्रायव्हेट सेक्टर फायनान्स कडून मनमानी पद्धतीने व्याज आकारण्याच्या घटना दिसून येत असून नागरिकांनी याबाबत तक्रारी सादर केल्या आहे. विशेषतः राजुरा निर्वाचन क्षेत्रातील परिसरात जास्त घटना घडत असून यावर आळा घालने आवश्यक आहे. अशी मागणीही मा.आमदार अॅड. संजय धोटे यांनी यावेळी निवेदनात केली आहे.त्याच प्रमाणे सर्वांना / संदेश दिला आपन घरीच राहा /सुरक्षित राहा अशा प्रकारे जनतेला आवाहन करण्यात आले आहे.