Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, एप्रिल ०८, २०२०

लॉकडाऊन नंतरही भद्रावती शहरातील आठवडी बाजार हाऊसफुल्ल




▪️ नागरीकांच्या गर्दीत भरला तिस-यांदा आठवडी बाजार
▪️ पालिका मुख्याधिकारीकडून संचारबंदीचा फज्जा
▪️ सोशल डीस्टंसींगचे उल्लंघन
▪️ मुख्याधिकारी ऐकत नसल्याने तहसीलदार व पोलीस विभाग हताश


भद्रावती (शिरीष उगे) :
भद्रावती शहरात बुधवार हा आठवडी बाजाराचा दिवस असतो. आज बुधवार (दि.8) ला नेहमीप्रमाणे आठवडी बाजार भरला होता. बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होती. 24 मार्चपासून देशात सुरु झालेल्या लॉकडाउन नंतर यापूर्वीच्या दोन्ही बुधवारला (दि.25 व दि.1) शहरात नेहमीप्रमाणे बाजार भरला होता.
14 एप्रिल पर्यंत जिल्ह्यात संचारबंदी लागु आहे. त्यानंतरही सातत्याने शहरात आठवडी बाजार भरला जातो व नागरीकांची एकच गर्दी दिसून येते. सोशल डीस्टंसींग पाळल्या जात नाही. जे भाजीपाला किंवा फळ विक्री करीत नव्हते, असेही चढ्या भावात भाजीपाला व फळ विक्रीचा व्यवसाय थाटून बसले आहेत. त्यामुळे कोरोणा विषाणु चा प्रादुर्भाव रोकण्यासाठी संचारबंदी, जमावबंदी यास शहरात हरताळ फासल्या गेल्याचे चित्र दिसून येत आहे.
कोरोना हा विषाणु शिंकल्याने, खोकल्याने व जवळ-जवळ राहल्याने फैलावतो. याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरु आहे. जगभर हाहाकार माजवणा-या कोरोना विषाणुची बाब एव्हढ्या साध्यापणे नगरप्रशासन घेत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याकडे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी लक्ष दयावे, अशी मागणी होत आहे

  • या उपाययोजना पालिकेने केल्या नाही
  • > नगरपालिका प्रशासनाने आठवडी बाजार भरल्या जाणार नाही, असा ध्वनिक्षेपक शहरात फिरविला नाही.
  • > सोबतच शहरातील वेगवेगळ्या परीसरात भाजीपाला विक्रीची केन्द्र नेमूण दिली नाही.
  • > सोशल डीस्टंसींग करीता बाजारात पांढरे पट्टे किंवा पांढरे गोल आखले नाही.
  • > आठवडी बाजार भरणार नाही व गर्दी होणार नाही. अशी कोणतीच खबरदारी घेतल्या जात नाही आहे.
  • > चौका-चौकात हैंडवॉश सेंटर उभारले नाही.
  • > करवसुलीचा ध्वनिक्षेपक बंद केला नाही.
  • > करभरणा मुदतवाढ दिली नाही.
  • > सॅनेटायझर, साबण, मास्क वाटप नाही.
  • > शहरातील वार्डा-वार्डात हायड्रोक्लोरीक-ॲसीड ची फवारणी फॉग मशीनद्वारे हवेत करण्यात आली नाही.
  • > वृध्द व लहान बालके यांसाठी घरपोच अत्यावश्यक वस्तू व औषधी पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही.
  • > क्वार्ंटाईन साठी पुरेसी व्यवस्था शहरात करुन ठेवली नाही.
  • > पुरेसे व्हेंटीलेटरचे नियोजन करुन ठेवले नाही.
--------------------------------------------

ही बाब नगरपालिका प्रशासनाकडे येत असल्याने तसे मी न.प. चे मुख्याधिकारींना कारवाई करण्याचे निर्देश देतो.
- महेश शीतोडे, तहसीलदार
--------------------------------------------
संचारबंदीच्या काळात शासनाच्या आदेशाप्रमाणे आमच्या विभागाचे काम सुरु आहे. आठवडीबाजार हा नगरपालिका प्रशासनाच्या अखत्यारीत येत असल्याने हे काम त्यांचे आहे.
- ठाणेदार सुनिलसिंह पवार
--------------------------------------------
नागरीकांना सांगुन सुध्दा ऐकत नाही. संचारबंदीमुळे ईतर दुकाने बंद असल्याने रोजीरोटी साठी दुकानदार भाजी व फळांचे दुकान लावून बसत असल्याने गर्दी वाढली.
-गिरीष बन्नोरे
मुख्याधिकारी, न.प. भद्रावती
आपल्या तक्रारीची नोंद करण्यात आली असुन यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संबधीत विभागाच्या प्रमुखास विचारणा करण्यात येवून संचारबंदीचे उल्लंघन यापुढे होणार नाही, याबाबत काळजी घेण्यास सांगण्यात येईल.
- जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.