Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, एप्रिल ०८, २०२०

रक्तदानाच्या माध्यमातून प्रशासनास मदत




कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्तुत्य उपक्रम

नागपूर - येथील सुयोग नगर, श्रीनगर मित्र मंडळ व विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ ) यांच्या संयुक्त विद्यमानाने आज (७ एप्रिल ) जागतिक आरोग्य दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ५८ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
राज्यात थैमान घातलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताची फार आवश्यकता असल्याने रक्तदानासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रक्तदानाचे आवाहन केले. समाजाचे आपण काही देणे लागतो या उद्दातहेतूने या आवाहनाला प्रतिसाद देत विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ व सुयोग नगर, श्रीनगर मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
अमन ब्लड बैक नागपूर तर्फे रक्त संकलन करण्यात आले. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टनशिंग पाळत ५८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदात्यांमध्ये मिलिंद वानखेडे, अमन टेमुर्डे, राजु पागोरे, मनिष बोडे, आनंद पल्लीवार, अभिजित गुटूवार , प्रविन ठाकरे, सचिन धकाते अविनाश बढे, महेश ढोले, राहुल जुनूनकर, सागर हिगवे, ज्ञानेश्वर मोहडिकर, अॅड. बी.भोयर, पंकज डहाके, मनिष धकाते, महेश गोडबोले, संदिप वैद्य, रमेश लाखमपूरे विनित वाटे, भारवारकन्त वर्मा, गिरीश वर्मा, संजय देशमुख मनिष पेंदाम, निलेश पाढुरकर, आनंद विश्वकर्मा, लोकेश बोबडे, सुनिल गावंडे, सुभाष भिषकर, सौरभ नारनवरे यांच्यासह इतर रक्तदात्यांचा समावेश होता. सामाजिक भावना जोपासत रक्तदान करणा-या सर्व रक्तदात्यांचे आयोजक अमन टेमुर्डे व मिलिंद वानखेडे यांनी आभार मानले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.