नागपूर : अरूण कराळे
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन स्तरावर निरनिराळे प्रयत्न होत आहेत. मात्र या काळात बांधकाम मजूर ,बेघर ,निर्वासित यांची अडचण होत आहे त्यांच्याकडे पैसा नसल्यामुळे अन्नधान्य खरेदी करू शकत नाही .
त्यामुळे गरीब मजूरांचे दोन वेळ जेवणाचे वांदे झाले आहे . दारोदार भटकत आहे. ही भयावह स्थिती अभिजीत सोसायटी मधील मित्र परिवाराला समजताच त्यांच्या मध्ये सेवा है यज्ञकुंड जागृत होऊन परिसरातील रामकृष्ण नगर ,मंगलधाम सोसायटी ,सत्यसाई सोसायटी मधील मित्रपरिवार एकत्र येवून पवनसुत हनुमान जंयतीच्या शुभपर्वावर प्रत्येक घरून चार ते पाच पोळी जमा करुन आणि स्वतः भाजी बनवून लॉकडाऊन संपेपर्यत गरजू नागरीकांना आपूलकीची शिदोरी नावाने भोजन देण्याचा उपक्रम सुरू केला आहे .
गरजू नागरीकांनी अभिजीत सोसायटी मधील हनुमान मंदीराच्या प्रांगणात सकाळी ११ ते दुपारी १. ३० व संध्याकाळी ७ ते ८ वाजता पर्यंत लाभ घ्यावा .या उपक्रमात केशव बांदरे , कमल कनोजे, चंद्रशेखर देशभ्रतार, जितेंद्र रहागडाले ,बापू लिमकर, देवराव खाटीक, समीर मसने,सुरेश विलोणकर ,दिलीप तराळेकर ,बबन ढोबळे ,नितीन अन्नपूर्णे , राकेश शिवणकर ,नितीन सावरकर ,गजेंद्र देवघरे ,राजेंद्र बिसेन ,अनिल घागरे आदी प्रयत्नरत आहे.


