Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, एप्रिल ०७, २०२०

wcl,आरोग्य,पोलिस,वीज कर्मचारी व सफाई कामगारांना लॉकडाऊन काळाचे वेतन डबल द्या

Navabharat घुगघुस में सासंद धानोरकर का ...
   खासदार बाळू धानोरकर यांची मागणी 
मुख्यमंत्री सहायता निधीला यथाशक्ती मदतीचे आवाहन
चंद्रपूर : सरकार सर्व शासकीय कर्मचार्‍यांच्या पगारात कपात केआरटी असतांना दुसरीकडे खा,बाळू धानोरकर यांनी या कठीण परिस्थितीत आरोग्य विभाग, पोलिस, वेकोली कामगार, वीज कर्मचारी व सफाई कर्मचारी अहोरात्र जीवाचे राण करून, जीवावर उदार होऊन सेवा देत आहेत.

या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना लॉकडाऊन काळातील डबल वेतन द्यावे, अशी आग्रही मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी मान. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेकडे करीत राज्यातील जनतेनेही यथाशक्ती मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करावी, असे आवाहन केले.

कोरोना विषाणुच्या गंभीर संसर्गामुळे केवळ आपला भारत देशच नाही तर संपूर्ण जगच त्रस्त आहे. अतिशय संसर्गजन्य अशा कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात देखील दिवसागणिक वाढतच आहे. मात्र,
कोरोना बाधीत, संशयित रूग्णांची सेवा आरोग्य विभागाचे डॉक्टर्स, कर्मचारी अहारोत्र करीत आहेत. पोलिस अधिकारी व कर्मचारी देखील जनतेला संसर्ग होऊ नये म्हणून अहोरात्र पहारा देत आहत. जनतेच्या आरोग्यासाठी सफाई कर्मचारी देखील सेवेत आहेत. वीज निर्मिती अखंड राहावी म्हणून वेकोली कामगार व वीज कर्मचारी देखील तत्परतेने सेवा देत आहे. 

यात अंडरग्राऊंड माईन्सचे उत्पादन ओपनकास्टचे तुलनेत कमी व संसर्गजन्स विषाणुचा अंडरग्राऊंड माईन्स कर्मचारी वर्गाचा संभाव्य धोका लक्षात घेता शक्य तेवढे कामगारांना पगारी विश्रांती द्यावी, सेवा देणाऱ्यांना डबल वेतन द्यावे. इतक्या गंभीर संसर्गजन्य विषाणुला मात देण्यासाठी हे सर्व जीवावर उदार होऊन सेवा देत आहेत. याकरिता त्यांना या काळाचे डबल वेतन देण्याची आग्रही मागणी खासदार धानोरकर यांनी केली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.