Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, एप्रिल १३, २०२०

कारंजा पोलीसांनी केली गावठी दारु जप्त; एकास अटक, एक आरोपी फरार

कारंजा/प्रतींनिधी:
येथील झोपडपट्टीतील इंदिरानगर येथे नाकाबंदी करून देववाडी(बेडा) येथुन आलेल्या एका मोटर सायकल अडवून त्यांच्याकडील ३० लीटर गावठी दारू जप्त करण्याची कामगिरी कारंजा (घा.) पोलिसांनी बजावली आहे.

माहितीनुसार, आरोपी रावेश भोसले देववाडी(बेडा) येथून कारंजा पोलिस स्टेशन परिसरात खासगी वाहनाने गावठी दारू घेऊन येत असल्याची गुप्त माहिती कारंजा पोलिस स्टेशन ला मिळाली. Tya माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक राजेंद्र शेटे व टीम ने इंदिरानगर भागात नाकेबंदी करत असताना एक मोटर सायकल येताना दिसली. त्याला थांबण्यास सांगितले असता त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्याचा पाठलाग करून अथक प्रयत्नानंतर इंदिरानगर येथील जितसिंग दुधारी यांच्या घरासमोर त्यांना अडवण्यात आले. तिथे झालेल्या झटापटीत आरोपी रावेष भोसले हा अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. 

परंतु, त्याचा सहकारी राजेश सुरांसिंग पवार (वय २१) याला अटक करून त्यांच्याकडील अंदाजे ६ हजार रुपये किंमतीची ३० लीटर गावठी दारु, मोटर सायकल व अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपासाअंती संपूर्ण गावठी दारु नष्ट करण्यात आली. दरम्यान, आरोपी राजेश सुरनसिंग पवार (२१) व फरार आरोपी रावेश भोसले, दोन्ही रा. देववाडी यांचे विरुद्ध कलम ६५ (अ),(ई), ८३ महाराष्ट्र दारुबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.