Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, एप्रिल १३, २०२०

MP चे मजूर अडकले नागपुरात,मजुरांच्या मदतीला धावले बबन गोरामन: अन्नधान्यही केले वाटप

चांपा/प्रतींनिधी:
कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी देशात व राज्यात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले .त्याचा फटका मध्यप्रदेशातील बालघाट जिल्ह्यातील 12 मजुरांना पडला .परराज्यातून कामानिमित्त नागपूर, हिंगणा तालुक्यातील शेषनगर गाव नजीकच्या जंगलात एका शेतात गेल्या तीन महिन्यापासून नवीन विहीर खोदकामाकरिता आले . 

कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी जिल्ह्यात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले .मध्यप्रदेशातून कामानिमित्त आलेल्या मजुरांना याचा फटका बसला.लॉकडाऊनमुळे हाताला काम नाही , शिवाय मूळ गावी परत जाता येत नसल्याने जवळ होते इतकं अन्नधान्यही संपल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली .तीन दिवसांपासून उपाशी पोटी जंगलात रात्र काढावी लागत असल्याने अन्नधान्यासाठी शेषनगर येथील रहिवासी बबन गोरामन यांच्या घरी येऊन आपली व्यथा मांडू लागले .
मध्यप्रदेशातील 12मजुरांवर उपासमारीची वेळ आली .ही बाब लक्षात घेऊन आदिवासी पारधी जनसेवा संस्थेचे अध्यक्ष बबन गोरामन यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत गरजूना लगेच सामाजिक संघटना तर्फे एका महिन्याचे मजुरांना अन्नधान्य वाटप केले .

तीन दिवसांपासून उपाशी पोटी रात्र काढावी लागत असल्याने मजुरांना अन्नधान्य मिळताच त्यांच्या चहऱ्यावर आनंदाचे अश्रूच फुलले .मदतीचा हात दिल्याबद्ल मजुरांनी बबन गोरामन यांचे आभार मानले .बबन गोरामन यांनी राज्यातच नव्हे तर देशातल्या विविध जिल्ह्यात अडकलेल्या पारधी बांधवांवर कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली.
देशात विविध ठिकाणी अडकलेल्या पारधी बांधवांनी बबन गोरामन यांच्याशी संपर्क साधला असता पारधी बांधवांवर उपासमारीची वेळ आल्याने ,देशात विविध राज्यातील जिल्ह्यात असलेल्या पारधी बेड्यावर अनेक कुटुंबाना आहे, त्याच जागी विविध सामाजिक संघटनाच्या माध्यमातून उपासमार सुरू असलेल्या पारधी बांधवांना अन्नधान्याची मदत पुरवली .देशात गरजूना मदतीचा हात देणाऱ्या खरे समाजसेवक बबन गोरामन यांच्या या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.