Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, एप्रिल १३, २०२०

चंद्रपूर:हेल्पिंग हॅंड्स सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना अन्न धान्य वाटप

चंद्रपुर/प्रतींनिधी: 
सध्या संपूर्ण जगामध्ये कॉरोना विषाणू चा प्रादुर्भाव वाढत आहे व Covid-19 च्या वैश्विक महामारी चा सामना सगळेच देश करत आहे. सरकारने आपल्या देशात लॉकडाउन जाहीर केले आहे व सर्वांना home quanrantine मध्ये राहून स्वतःची काळजी घ्यायची विनंती केली आहे. संपूर्ण बाजारपेठ बंद आहे, त्यामुळे रोजंदारी वर जगणाऱ्या लोकांचे हाल होत आहे. म्हणूनच हेल्पिंग हॅंड्स चंद्रपूर या सामाजिक संस्थे तर्फे सर्व गरीब व गरजू लोकांना रोज लागणाऱ्या व खाण्याच्या वस्तूंचे वितरण रविवार, 12 एप्रिल, 2019 रोजी करण्यात आले. 

वितरण किट मध्ये तांदूळ, दाळ, कणिक, डेटोल साबण, साखर, काही मसाले, तेल, बिस्कीट या सर्व गोष्टींचा समावेश होता. नांदगाव पोडे, छोटा नागपूर रोड, पडोली आणि काही भागातल्या गरजू लोकांना ह्या सामानाचे वाटप करण्यात आले. पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा ह्या संस्थे तर्फे असा वाटप करण्यात येईल, त्या मुळे कुठे आपल्या निदर्शनात काही गरजू लोक किव्वा परिवार असतील त्यांची माहिती संस्थेला देण्यात यावी असे आव्हान संस्थे तर्फे करण्यात आले आहे.
संस्थेचे अध्यक्ष राहुल शर्मा, उपाध्यक्ष देबाशीष सिंग, सचिव यश बांगडे, प्रतिक हर्णे, जितेश अल्लेवार, चेतन मित्तल, शिवानी कुयाते, परीक्षित केदारपवार, प्रिया वासनिक, वैभव पामपट्टीवर ह्या सगळ्यांनी या कार्यामध्ये मदत केली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.