निफन्द्रा-प्रतिनिधी
येथील प्रवीणभाऊ आडेपवार माध्यमिक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयातीलवर्ग 8 वि मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोना संसर्गामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचित असल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शाळास्तरावर शिल्लक असलेला तांदूळ ,डाळ ,मटकी विद्यार्थ्यांना समप्रमाणात वितरीत करण्याच्या आदेशनुसार शाळेत शिक्षण घेणाऱ्या बारसागड गावातिल विद्यार्थ्यांचे गावात जाऊन घरपोच वितरित करण्यात आले. स्थानिक विद्यार्थ्यांना शाळेतच धान्य वितरित करण्यात आले. धान्य वितरित करताना सोशल डिस्टनसिंग के अनुपालन करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समितीचे विजयराव आडेपवार यांचे मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक रवींद्र कुडकावार व सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी नियोजन करून वितरीत करण्यात आले.यावेळी पोलीस पाटील हरिभाऊ बोडे व पालक उपस्थित होते. बाहेर गावातील विद्यार्थ्यांना घरपोच धान्य पुरवल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले.