नागपूर/ प्रतिनिधी
शहरामध्ये कोरोना आजाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे, ग्रामीण भागात,व शहरामध्ये कोरोना रुग्ण शोधण्यासाठी सर्वेक्षण करणे सुरू आहे,यासाठी शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे,या शिक्षकांना सुरक्षेसाठी साहित्य पुरविण्यात यावे,अशी मागणी डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदचे नागपुर विभागीय अध्यक्ष संजय निंबाळकर यांनी केली आहे.
मागील दिवसापासून सर्वेक्षण कार्य सुरू आहे. अंदाचे 500 शिक्षक हे काम करत आहे. सर्वेक्षण करण्यासाठी जातांना मास्क, ग्लोव्हज ,आणि सॅनिटायझर दिले जाते, मात्र बहुतांश शिक्षकांना सेफ्टी किंवा पीपीई किट दिली जात नाही, तसेच डॉ, वआरोग्य कर्मचार्यप्रमाणे सर्वेक्षण करणाऱ्या शिक्षकांचाही विमा काढावा अशी मागणी नागपूर विभागीय अध्यक्ष संजय निंबाळकर यांनी केली आहे