नगर परिषद सफाई कामगारांना भोजनदान.
आपल्या कार्यक्षेत्राचेही केले निर्जंतुकीकरण.
राजुरा:
कोविड -19 चा प्रादुर्भाव रोकण्याकरीता जवळपास सर्वच क्षेत्रातिल अधिकारी ,कर्मचारी ,राजकीय व सामाजिक ,धार्मिक संघटना या युध्दपातळीवर कामाला लागले आहेत. अश्यातच भूक तहान विसरून या सर्वांनी कोरोणा ला हरवीन्याकरीता आपआपल्या स्तरावर प्रयत्न सुरू केले आहे. नागरिकांचे आरोग्य चांगले राहन्याकरीता नगर परिषदेचे सफाई कामगार सुधा परिश्रम करीत आहेत.
अश्या सफाई कामगारांनकरीता नगरसेवक राजेंद्र विठल्लराव डोहे यांनी स्वखर्चातून भोजनदान केले. यावेळी चंद्रकांत कुईटे, गजानन येरणे , अमोल जाभोर , उमेश पेंदोर ,सचिन डोहे , छब्बी नाईक , आकाश गंधारे , अजय श्रीकोंडा, बादल बेले, प्रा. बी.यू. बोर्डेवार ,जुगल डोहे आदिसह नगर परिषदेचे सफाई कामगार मोठ्या संख्येने उपस्तीत होते. सामाजिक अंतर व स्वच्छ हात धूउन आणि तोंडावर मास्क वापरावे तसेच स्वच्छता करीत असतांना सफाई कामगारांनी आपल्याही आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच नागरीकांच्या आरोग्याकरीता सफाई कामगारचे कार्य हे महत्वपूर्ण आणि कौतुकास्कापद असल्याचे मत राजेंद्र डोहे यांनी व्यक्त केले.यावेळी सोमनाथपूर परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात आले.