आज देश सेवा व समाजसेवा केल्याचा आला अनुभव : महेश अढाऊ
कपिल वानखेडे / तालुका प्रतिनिधी सावनेर
खापरखेडा : जगभरात कोरोना वायरसचे थैमान असून सर्व शक्तिशाली अमेरिका सारखा देश व चीन ,इटली , स्पेन यासारख्या 200 च्या वर देशा मध्ये कोरोना पसरला असून भारत देशासह राज्यात दिवसेंदिवस कोरोना वायरसचे रुग्ण आढळून येत आहे केंद्र व राज्य शासन अनेक उपाययोजना करीत आहे लॉक डाऊन करण्यात आले आहे गर्दी टाळण्यासाठी संचारबंदी सुरू आहे मात्र काही नागरिक घरात न राहता रस्त्यावर आढळून येत आहे त्यामुळे पोलीसांना नाकीनऊ झाले आहे लॉक डाऊन असल्यामुळे दैनंदिन लागणाऱ्या जिवनावश्यक वस्तू आवश्यक आहेत मात्र किराणा व भाजीपाला घेताना सोशल डिस्टन्स आढळून येत नाहीत त्यामुळे संसर्ग पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे पोलीस,देवदूत डॉक्टर, नर्स ,सपाई कर्मचारी व शासन,प्रशासन आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत आहे तसेच स्थानिक राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्त्यांनी विशेष लक्ष देऊन गरजु व गोरगरीब ज्यांना खऱ्या अर्थानी गरज आहे अश्या लोकांना जेवना पासून तर जीवनाआवश्यक वस्तुचा वाटप करून व त्यांच्या राहण्याची सोयही करीत आहे या सर्वावर पोलीस यंत्रणा दिवस रात्र एक करून आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना विरोधात नागरिकांना सामाजिक दूरी , गर्दी न करने , आपल्या घरीच राहून आपले काम करने , वीना कारण घरून बाहेर न निघने याबाबत जनजागृति करीत आहे परंतु पोलिसांची काळजी घेणार कोण त्यांच्या चाह ,नास्ता , जेवना ची चिंता कोन करेल अश्यातच खापरखेडा परिसरातील अनेक सामाजिक , राजकीय पक्षाचे लोक पोलिसां करीता चाह ,नास्ता , जेवन देण्याचे कार्य करीत आहे
अश्याप्रकारे नेहमी सामाजीक बांधीलकी म्हणून समाज कार्यात अग्रेसी भूमिका जपनारे समाजाचा व देशाचा विचार करणारे के एम अढाऊ कंपनी चे मुख्य मालक खापरखेडा परिसरातील जेष्ठ कंत्राटदार किसनराव अढाऊ यांनी आपल्या मुलाच्या महेश अढाऊ यांच्या वाढदिवसाच्या निमित्याने खापरखेडा पोलीस स्टेशन चे पोलिस अधिकारी ,पोलीस , होमगार्ड , हे जिथे जिथे कर्तव्या वर असलेल्या ठिकाणी जाऊन नास्ता व पाण्याची व्यवस्था केली
यावेळी महेश बोलले की प्रत्येक मनुष्य स्वतः सोबतच आपल्या परिवाराची काळजी घेत असतो परंतु जो आपल्या देशाच्या सिमेची रक्षा मिलट्री जवान व आपल्या समाजाची रक्षा पोलीस करते कोरोनाच्या वाईरस पासून सर्वानी घरातच राहिले पाहिजे म्हणून पोलीस यंत्रणा आपल्या परिवाराची काळजी न करता जे आपले कर्तव्य प्रामाणिक पणे बजावीत आहे त्यांच्या नास्ता, जेवणाची काळजी घेणार कोण आज मला माझ्या वाढदिवसाच्या निमित्याने मला माझ्या वडिलांनी देश सेवा व समाजसेवा करण्याची संधी मिळाली आहे सर्व जनतेनी प्रशासन व शासनाच्या नियमाचे पालन केले तर आपण सुरक्षित तर परिवार ,समाज , जिल्हा , राज्य , देश सुरिक्षत घरी राहून स्वतः सोबत इतरांना ही सुरक्षित ठेवा सामाजिक दूरी ठेवा