चंद्रपूर/प्रतिनिधी:
4 एप्रिल रोजी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र चंद्रपूर द्वारे गरीब-गरजू लोकांना मदत म्हणून अधिकारी, कर्मचारी व सर्व संघटनेच्यावतीने सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून प्रत्येकी 12 किलो प्रमाणे जीवनावश्यक वस्तूंच्या एकूण 1000 कीट श्री राजू घुगे, मुख्य अभियंता चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र चंद्रपूर यांच्या हस्ते माननीय डॉ. कुणाल खेमनार, जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे हस्तांतरित करण्यात आल्या.
यामध्ये तांदूळ 7 किलो, तूरडाळ,मूग डाळ, साखर,तेल प्रत्येकी 1 किलो तर तिखट,मीठ प्रत्येकी 200 ग्रॅम, तर हळद,मसाला प्रत्येकी 100 ग्रॅम आणि डेटॉल साबण इत्यादी साहित्याचा समावेश आहे.
याप्रसंगी श्री निलेश गोड तहसीलदार, चंद्रपूर, श्री अनिल आष्टीकर, श्री राजेश कुमार ओसवाल, श्री राजेश राजगडकर, उपमुख्य अभियंता, श्री सुनील कुलकर्णी, अधीक्षक अभियंता, श्री आनंद वाघमारे, कल्याण अधिकारी व श्री नवीनकुमार सत्तीवाले, उप वरिष्ठ व्यवस्थापक सुरक्षा तसेच चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र येथील सर्व संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.