चंद्रपूर/प्रतिनिधी:
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनमुळे एका महत्त्वाची बाब समोर आली आहे. लॉकडाऊनमुळे हवेतील प्रदूषणाची पातळी प्रचंड कमी झाली असल्याचे समोर आले आहे.
प्रदूषित शहराच्या यादीत असलेल्या चंद्रपूरचे प्रदूषण देखील कमी झाल्याचे अहवालात समोर आले आहे.मार्च 2019 पेक्षा 2020 चंद्रपूर शहरातील हवेतील प्रदूषण तब्बल ४८.२ टक्क्यांनी कमी झाले आहे. देशात महाराष्ट्रात लॉकडाऊनची सुरुवात आधी झाली.त्यामुळे अनेक कंपन्या, कारखाने,
आस्थापना, दळणवळण यंत्रणा ठप्प झाली. याचा परिणाम हवामानाच्या गुणवत्तेवर झाल्याचे बघायला मिळत आहे. चंद्रपूरची ओळख प्रदूषित आणि उष्ण जिल्हा म्हणून आहे.
हवामान गुणवत्ता आणि हवामान अंदाज संशोधन केंद्राच्या माहितीनुसार लॉकडाऊनमुळे हवेतील प्रदूषणाची पातळी कमी झाली असल्याचे समोर आले आहे.
प्रदूषित शहराच्या यादीत असलेल्या चंद्रपूरचे प्रदूषण देखील कमी झाल्याचे अहवालात समोर आले आहे.मार्च 2019 पेक्षा 2020 चंद्रपूर शहरातील हवेतील प्रदूषण तब्बल ४८.२ टक्क्यांनी कमी झाले आहे. त्यामुळे आता शहर ठप्प झाले,असताना शहरवासी मोकळा श्वास घेत आहेत.
याच पाठोपाठ दिल्ली, अहमदाबाद आणि पुणे या तीन शहारातील हवामानात चांगलाच फरक पडल्याची माहिती हवामान गुणवत्ता आणि हवामान अंदाज, संशोधन केंद्राने दिली आहे.
लॉकडाऊनमुळे हवेतील प्रदूषणाची पातळी प्रचंड कमी होत दिल्ली, अहमदाबाद आणि पुणे या तीन शहारातील हवामानात चांगलाच फरक पडल्याची माहिती हवामान गुणवत्ता आणि हवामान अंदाज, संशोधन केंद्राने दिली आहे. कोरानाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडॉऊनमुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. मात्र, याचा वेगळ्या अर्थाने
फायदाही झाला आहे.
श्वसनासाठी धोका वाढवू शकणार्या नायट्रोजन ऑक्साईडच्या (एनओएक्स) प्रदूषणाची पातळीदेखील कमी झाली आहे. नायट्रोजन ऑक्साईडचे प्रदूषण मुख्यतः मोटार वाहनांच्या वाहतुकीमुळे होते. पुण्यात नायट्रोजन ऑक्साईडचे प्रमाण ४५ टक्क्यांनी कमी झाले आहे.
मुंबईत ३८ टक्क्यांनी आणि अहमदाबादमध्ये ५० टक्क्यांनी कमी झाले आहे.लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे लोक घरीच आहेत. अनेक जण वर्क फ्रॉम होम करीत आहेत. त्यामुळे रस्त्यांवर वाहतूक कमी आहे. अनेक कंपन्या बंद असल्याने कच्चा मालाच्या पुरवठ्यासाठीची वाहतूक बंद आहे.
वाहतूक बंद असल्याने गाड्यांचा धूर, धुळही कमी झाला आहे. मोठी शहर ठप्प झाली आहे. त्यामुळे शहर आता मोकळा श्वास घेत आहे.मार्च २०१५ मध्ये मुंबईतील हवा एक्यूआय १५३ होती. मात्र आता, २०२० मार्च महिन्यात मुंबईतील वायुची शुद्धता एक्यूआय ६६ इतकी नोंदवण्यात आली आहे.
चंद्रपूर, नागपूर, महाराष्ट्र आणि देशातच प्रदूषण ४० ते ५० टक्क्यांनी कमी झाले आहे, पक्षांची किलबिल ऐकू येते आहे, असे ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी सांगितले.