नागपूर सतरंजीपूरातील क्वारंटाईन वानाडोंगरीत
भाजपा ,राष्ट्रवादी कॉंग्रेसची मागणी
नागपूर : अरूण कराळे
नागपूरातील सतरंजीपुरा येथील कोरोना विषाणू संसर्गित असल्याचा संशय असलेले जवळपास १२६ नागरीक वानाडोंगरी येथील समाजकल्याण विभागाचे मुलांचे शासकीय वसतिगृह येथे आणून ठेवण्यात आले आहेत.
वानाडोंगरी परिसरात दाट लोकवस्ती असून बाजूलाच औद्योगिक क्षेत्र व कामगार वास्तव्य करीत असणाऱ्या इसासणी, नीलडोह डिगडोह इत्यादी दाट लोकवस्तीच्या वसाहत आहेत.
संशयित रुग्ण ज्या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत तेथे क्वारंटाईन नियमाप्रमाणे सुविधांचा अभाव आहे जसे प्रत्येक रुग्णांसाठी वेगळी रूम, वेगळे शौचालय, आदी त्याच प्रमाणे नागपूर शहर हे रेड झोन असून ग्रामीण भाग हा ग्रीन झोन मद्ये आहे त्यामुळे शहरातील संशयित रुग्ण ग्रामीण भागात स्थलांतरीत करणे योग्य नाही .
तेव्हा सदर संशयीत रुग्ण दुसरीकडे तातडीने हलविण्यात यावे अशी मागणी माजीमंत्री रमेशचंद्रबंग यांनी पालकमंत्री नितीन राऊत, गृहमंत्री अनिल देशमुख, कॅबिनेट मंत्री सुनिल केदार व नागपूर जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांच्या कडे केली . यावेळी जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग,जिल्हा परिषद सदस्य सुचिता ठाकरे, पंचायत समिती सभापती बबनराव अव्हाळे, प. स. सदस्य पौर्णिमा मिश्रा, आकाश रंगारी, पुरुषोत्तम डाखळे, नगरसेवक नारायण डाखले, गुणवंता मते, वंदना दादाराव मुळे उपास्थित होते.
वानाडोंगरी हिंगणा येथील समाजकल्याण विभागाचे मुलांचे शासकीय वसतिगृह जे सतरंजीपुरा नागपूर येथील १६० संशयित व्यक्तींना क्वारंटाईन केले आहेत त्यामुळे परिसरातील नागरिक दहशतीत आहेत सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . या परिसरातील राहिवाश्यांचा विचार करून क्वारंटाईन केलेल्या लोकांना जिथे लोकवस्ती नसेल अश्या ठिकाणी व्यवस्था करावी अशा आशयाचे निवेदन गुरुवार २३ एप्रिल रोजी नागपूरचे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांना वाडी शहराचे भाजपाचे अध्यक्ष केशव बांदरे यांनी दिले