एमआयडीसी वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम
नागपूर : अरूण कराळे:
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोकण्याकरिता सर्वानी सुरक्षेचे व नियमाचे पालन करावे व घरीच सुरक्षित राहावे.संचारबंदीच्या काळात जनतेच्या मनोरंजनाकरीता एमआयडीसी वाहतूक पोलिसांनी मनोरंजन आपल्या दारी,आपण रहावे घरी, असा विशेष कार्यक्रम एमआयडीसी वाहतूक पोलिसांची सुरु केला .
विदर्भ कलाकार संघटना नागपूर द्वारा कोरोनाशी लढाईत आपले सहकार्य अनमोल आहे असा मनोरंजन रथ वाडी परिसरात मनोरंजनाकरीता फिरविण्यात आला. सर्वप्रथम लेक व्हीव अपार्टमेंटच्या परिसरात मनोरंजन रथ उभा करून रविवार २६ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता एमआयडीसी वाहतूक पोलीस विभागाचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक संजय जाधव यांनी मनोरंजन मोहीमची सुरुवात केली .
या मनोरंजन कार्यक्रमात विदर्भ कलाकार सघांचे संगीतकार सिलवंत सोनटक्के,अभिजित कडू, सन्नी लोखंडे,किरण दिळशे, मनीषा राऊत,तसेच वाहतुक पोलीसांनी गीत गायन केले . यावेळी विदर्भ कलाकार संघाचे अध्यक्ष शिवराज ठाकूर,पोलीस उपनिरिक्षक विनोद गिरी, उपनिरीक्षक किशोर गवई, पोलिस हवालदार बाळू चव्हान,विनोद सिंग, जयशंकर पांडे, विलास कोकाटे,देवकूमार मिश्रा, रविंद्र गजभिये , सुरेश तेलेवार, मिलींद कोल्हे आदी वाहतूक पोलिस कर्मचारी वर्ग उपस्थित होते.