Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, एप्रिल २७, २०२०

नागपूर:सहा रुग्ण कोरोनामुक्त होऊन परतले घरी:एकूण ३० रुग्ण झाले पूर्णतः बरे

नागपूर/प्रतिनिधी:
 कोरोनाच्या महासंकटात नागपूर शहरासाठी एक आनंददायी बातमी आहे. कोरोनाची लागण झालेले आणि उपचार घेत असलेले सहा रुग्ण पूर्णतः बरे झाले असून सोमवारी (ता. २७) त्यांना सुटी देण्यात आली.
पूर्णतः बऱ्या झालेल्या रुग्णामध्ये एक रुग्ण कामठी, एक सतरंजीपुरा आणि ४ जबलपूरचे ज्यांचे वास्तव्य सध्या मोमीनपुरा येथे होते, यांचा समावेश आहे.

या सर्व सहाही रुग्णांना १२ एप्रिल रोजी आमदार निवासातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. कोरोनाची लागण झाल्याचे अहवालात स्पष्ट झाल्यानंतर त्यांना इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व मेयो रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर १४ व्या दिवशी म्हणजे २५ एप्रिल रोजी आणि १५ व्या दिवशी म्हणजे २६ एप्रिल रोजी त्यांचे नमुने घेण्यात आले. हे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्व सहाही जणांना आज घरी पाठविण्यात येत असल्याचे मेयो रुग्णालयाचे उपअधीक्षक डॉ. सागर पांडे यांनी सांगितले.

सर्व रुग्णानी उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्याचे आणि प्रशासकीय यंत्रणेचे आभार मानले. उपचार करणाऱ्या चमूनेही त्यांचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.