बहुजन विकासमंत्री यांना निवेदन
चंद्रपूर/प्रतिनिधी:
कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी, चंद्रपूर यांच्या मार्फ़त आवश्यक पदभरतीसाठी दिलेल्या जाहिरातीमध्ये ओबीसी प्रवर्गाला वगळ्ले आहे. त्यांच्यावर झालेल्या या अन्यायासंदर्भात संबंधित विभागाला चौकशीचे आदेश द्यावे.
याशिवाय दिलेली जाहीरात रद्द करून ओबीसी आरक्षणाचा समावेश असलेली जाहीरात नव्याने प्रकाशित करण्याची मागणी डॉ. ऍड. अंजली साळवे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. श्री उद्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री ना. श्री अजितदादा पवार, सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याणमंत्री ना. श्री राजेश टोपे अणि बहुजन विकास, मदत व पुनर्वसन तथा पालकमंत्री, चंद्रपूर ना. श्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे.
आयुक्त, आरोग्य सेवा, व अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांच्या मार्गदर्शक सुचनांनुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी, चंद्रपूर यांनी दिलेल्या जाहीरातीनुसार संबंधित विभागाच्या पदभरतीमध्ये 48 पदांपैकी ओबीसी प्रवर्गासाठी एकही पद आरक्षित नाही. ओबीसी प्रवर्गास या पदभरतीतून वगळण्यात आले आहे व हा ओबीसी प्रवर्गावर अन्याय आहे.
यामुळे सदर विभागाने या पदभरतीमध्ये ओबीसी प्रवर्गाला का वगळले आणि ओबीसी प्रवर्गाची भरती याआधी केली असेल तर त्याबाबतची ओबीसी आरक्षणाचा उल्लेख असलेली जाहीरात प्रकाशित झाली होती का? असा प्रश्नही डॉ. ऍड. अंजली साळवे यांनी आपल्या निवेदनातून उपस्थित केला आहे.
यामुळे सदर विभागाने या पदभरतीमध्ये ओबीसी प्रवर्गाला का वगळले आणि ओबीसी प्रवर्गाची भरती याआधी केली असेल तर त्याबाबतची ओबीसी आरक्षणाचा उल्लेख असलेली जाहीरात प्रकाशित झाली होती का? असा प्रश्नही डॉ. ऍड. अंजली साळवे यांनी आपल्या निवेदनातून उपस्थित केला आहे.
यासंदर्भात उच्च स्तरावरून संबंधित विभागाला चौकशीचे आदेश देऊन, योग्य तो खुलासा मागवावा सोबतच याप्रकरणी दोषी आढ़ळणा-यांवर नियमाप्रमाणे योग्य ती कारवाई करावी. याशिवाय वर्तमान जाहीरात रद्द करून बिंदू नामावलीच्या आधारे इतर प्रवर्गाच्या आरक्षणासोबत ओबीसी आरक्षणाचा समावेश असलेली जाहीरात नव्याने दुरुस्तीसह प्रकाशित करण्याची मागणीही डॉ. ऍड. अंजली साळवे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. श्री उद्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री ना. श्री अजितदादा पवार, सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याणमंत्री ना. श्री राजेश टोपे अणि बहुजन विकास, मदत व पुनर्वसन तथा पालकमंत्री, चंद्रपूर ना. श्री विजय वडेट्टीवार यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.