आठ दिवसापासून सुरु आहे स्त्युत्य उपक्रम
नागपूर : अरूण कराळे:
तालुक्यातील वाडी येथील स्वराज एकता मंडळातर्फे बुधवार ८ एप्रील पासून समर्थ गजानन सोसायटीच्या श्री समर्थ गजानन महाराज मंदीराच्या प्रांगणात अन्नदान वाटप सुरू आहे . दररोज होणाऱ्या अन्नदान वाटपात ४०० गोरगरीब कामगार लाव्हा येथील महादेवनगर ,हिलटॉप कॉलनी , संतोषी माता नगर ,वाडीतील दत्तवाडी ,समर्थ गजानन सोसायटी ,हरिओम सोसायटी येथील भाग घेत आहे . या उपक्रमासाठी स्वराज एकता मंडळाचे अभय कुणावार ,अनील भाटीया ,सचिन कुटे ,नारायण केसरवाणी ,अविनाश हुद्दार ,जयंत सिंगरू ,राजा अय्यर,श्यामलाल सकलानी ,अरूण पगारे ,वल्लभ सकलानी ,विनोद पटले ,प्रभुदयाल देशमुख ,प्रमोद सकलानी ,मनीष गाडे ,सुनील बनकोटी आदी कार्यरत आहे.