खबरबात /चंद्रपुर:
चंद्रपूर शहरात कोरोंनाचा एकही पेशंट नाही, त्यामुळे चंद्रपूरकरांना सध्यातरी घाबरण्याची गरज नाही. असे असले तरी मात्र चंद्रपूरकरांना काळजी मात्र 100% घ्यावी लागणार आहे. हे झाले कोरोणा बाबतचे पण आता चंद्रपूरकर एका वेगळ्या त्रासाने त्रासले आहेत व चिंतेच आहेत.
ते असे की चंद्रपूर शहरातील घुटकाळा परिसरातील आंबेकर ले आउट महात्मा फुले प्राथमिक शाळेच्या परिसरात डुकरांच्या लागोपाठ होणार्या मृत्यूमुळे.
मागील 3 दिवसांपासून सतत या परिसरात एकापाठोपाठ एक डुकरांचा मृत्यू होत आहे,शनिवार २,रविवार ४,सोमवार ३ असे ऐकून 9 डुकरांचा गेल्या 3 दिवसात मृत्यू झालेला आहे. ही बाब नागरिकांनी नगरसेवकांना सांगितली, नगरसेवकांनी महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना बोलवून ते मृत डुक्कर वाहनात नेऊन दूरवर टाकून देण्याचे संगितले. कर्मचार्यांनी तसे केले देखील.
मात्र सलग 3 दिवस डुकरांचा मृत्यू होत असल्याने परिसरात एखादी अनुचित प्रकार घडू शकण्याची शक्यता नागरिकांनी वर्तवली आहे. तर नगरसेवक या घटणेला हलक्यात घेत आहेत, असे नागरिक सांगत आहेत.
डुक्कर मेले की नागरीक नगरसेवकांना फोन लावतात, नगरसेवक गाडी पाठवून सफाई कर्मचार्यांच्या मार्फत ते मृत डुक्कर उचलून नेऊन टाकतात, हा क्रम सतत 3 दिवस झाले अशाच पद्धतीने सुरू आह.
मात्र डुकरांच्या मारण्याचे नेमके कारण काय? त्यांच्या खाण्यात विषबाधा झाली का? किंवा अन्य विषारी पदार्थ त्या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत का? याचा मात्र शोध महानगरपालिका घेत नाहीये. अशा प्रकारे गेल्या 3 दिवसात 9 डुकरांचा मृत्यू झाल्याने परिसरात सध्या भीतीचे वातावरण आहे.
मात्र महानगरपालिकेने याकडे गांभीर्याने अजून पर्यंत बघितले नाही. विशेष म्हणजे वारंवार डुक्कर मारत असल्याने मेलेल्या डुकरांचे नमुने घेऊन तपासणी विभागात पाठवून डुकरांच्या नेमक्या मृत्युचे कारण काय? तसेच परिसरात आणखी काही विषारी पदार्थ ठेवले आहेत का? ज्यामुळे डुकरांचा मृत्यू होत आहे हे,हे शोधणे महत्त्वाचे आहे.
तसे न करता महानगरपालिका व नगरसेवक याकडे दुर्लक्ष करत असून नुसते डुक्कर मेले की नेऊन टाकण्याचा प्रकार याठिकाणी सुरू आहे. अशातच एखादी अनुचित प्रकार घडण्यात वेळ लागणार नाही.
त्यामुळे आधीच कोरोंनाने घाबरलेले लोक आता सततच्या डुकरांच्या होणार्या मृत्यूमुळे देखील घाबरले आहे. लगोपाठ मरणार्या डुकरांची साखळी बघून परिसरातील नागरिकांनी मृत डुकरांचे नमुने घेऊन तपासणी करण्यात यावी व परिसरातील विषारी पदार्थाचा शोध घेण्यात यावा,तसेच परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे.