चंद्रपूर/प्रतींनिधी:
सद्यस्थितीत चंद्रपूर शहरात एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेला नाही. मात्र राज्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे युद्ध स्तरावर सफाई मोहीम राबविली जात आहे. भविष्यात उद्भवणारी आपात्कालीन सदृश्य परिस्थिती हाताळण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका आरोग्य व सफाई कर्मचारी नियमित सेवा देत आहेत.
शहर निर्जंतुकीकरण करण्याच्या दृष्टीने मनपा प्रशासनाने युद्ध स्तरावर सम्पूर्ण शहरात फवारणी, धुरळणी, आवश्यक ठिकाणी जंतुनाशक पावडर टाकण्यात येत आहे, बाजार, रेल्वे स्टेशन,बस स्टँड, वर्दळीचे ठिकाणे, पब्लिक कम्युनिटी टॉयलेट ,दवाखाने, कृषि उत्पन्न बाजार समिति परीसर येथे फवारणी धुरळणी व निर्जंतुकीकरण मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे
' डीप क्लीनिंग ' मोहीमेअंतर्गत दररोज एक परिसर झाडुन स्वच्छ करून निर्जंतुकीकरण करण्यासाठी रस्त्यावर व परिसरातील दुकानांवर फवारणी, एटीएम केंद्राची स्वच्छता, ब्लिचिंग पावडर टाकून परीसर पुर्णपणे स्वच्छ व निर्जंतुक राहील याची काळजी घेण्यात येऊन डीप क्लीनिंग ' मोहीम राबविण्यात येते.
येणाऱ्या पावसाळ्यात मोठ्या तसेच छोट्या नाल्यात सांडपाणी तुंबून न राहता पुढे वाहून जाईल, सांडपाण्याला वेग आल्याने नाल्याजवळील दुर्गंधी कमी व्हायला मदत होईल या दृष्टीने मान्सूनपूर्व नाले स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. इंडियन चिकन सेंटर जवळचा नाला, अंजीकर नाला, स्वावलंबी नगर नाला, महसुल पुलाजवळील नाला, माेदु कसाई ऩाला, भिवापूर प्रभाग रावण एरिया मोठा नाला, माता नगर छत्तीसगडी मोहल्ला मोठा नाला, विदर्भ हाऊसिंग कॉलनीइंडस्ट्रीयल प्रभाग, बघड खिडकी, उडिया बस्ती सावरकर नगर जवळ हे जे. सी.बी द्वारे तर इंडस्ट्रीयल प्रभाग मध्ये मच्छी नाला मुक्ती कॉलोनी ते ताडी दुकान पर्यंत, चांदा फोर्ट स्टेशन जवळील मोठा नाला, एमईएल नाला आदी नुष्यबळ व जेसीबी च्या मदतीने तेथील गाळ आणि कचरा तसेच नाल्याभोवती वाढलेली झाडेझुडपी व नाल्यातील माती दगड बाहेर काढले जात आहे.
बंगाली कम्प भाजी मार्केट परिसर, इंदिरा नगर चौक, महाकाली मंदिर, कृष्णा नगर, मटन मार्केट एकोरी वार्ड , कोलबा चौक.भानापेठ, जाकीर हुसैन शाळा.महाकाली मंदिर, बनकर मोहला.विठ्ल मंदिर, बोहरा मस्जिद गोपालपुरी, मासुम आखाडा.भानापेठ, सरकारी दवाखाना, टिळक मैदान गोल बाजार, बुरड मोहल्ला,हिवरपुरी विठ्ल मंदिर, वासेकर चौक, राजीव गांधी शाळा बीएसएनएल ऑफिस, ओम भवन, मनपाच्या शाळा, बेघर निवारा केंद्रे, क्वारंटाईन सेंटर फॉरेस्ट अकॅडमी, वसंत भवन, तलाठी प्रशिक्षण केंद्र, आदी परिसरात मनुष्यबळ तसेच आवश्यक तेथे टँकरद्वारे फवारणी करण्यात येत आहे.