Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, एप्रिल १६, २०२०

चंद्रपूर:कोरोनाच्या पार्शवभूमीवर साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा ३ मे पर्यंत लागू राहणार

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ...
जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
चंद्रपूर /प्रतिनिधी:
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणुमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणुन घोषीत केला आहे. तसेच कोरोना विषाणुचा प्रसार भारतात, महाराष्ट्रात गतीने पसरत आहे असे दिसुन येत असल्याने राज्य शासनाने कोरोना विषाणु (कोविड-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथीचा रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि. 13.02.2020 पासुन लागु केलेला आहे, सद्यस्थितीतही कोरोना विषाणुचा वाढता प्रकोप लक्षात घेता मा. जिल्ह्याधिकाऱ्यांच्या आदेशानुसार चंद्रपूर शहर हद्दीत सदरच्या प्रतिबंधात ३ मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. 

सदर आदेशानुसार जिल्हयात मोठ्या प्रमाणात लोकांचा समुह एकत्र जमु न देता व कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी संपुर्ण चंद्रपूर जिल्हयामध्ये घेण्यात येणारे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मीक, क्रिडा विषयक प्रदर्शने ब शिबीरे, सभा, मेळावे, जत्रा, यात्रा, रॅली, धरणे आंदोलन, लग्न समारंभ, इत्यादी कार्यक्रमास मनाई करण्यात येत आहे. तसेच जनतेसही एकत्र जमण्यास मज्जाव करण्यात येत आहे. तसेच संबधीत विभागाकडून मोठया प्रमाणात लोक एकत्र येतील अश्या कोणत्याही कार्यास परवानगी न देण्याचे प्रतिबंधात्मक आदेश देण्यात आले आहेत. 

या अंतर्गत 

1. या आदेशानुसार सार्वजनिक स्थळी दोन किंबा दोनपेक्षा जास्त व्यक्‍तींनी एकत्र जमा होऊ नये. 

2. कोरोना विषाणु (कोव्हिड-19) च्या अनुषंगाने कोणत्याही नागरीकांनी समाजात, जनमानसात अफवा, अपप्रचार ब भिती व्हॉटसअँप, फेसबुक, ट्वीटर, वृत्तपत्र, सोशल मिडीया व होर्डिंग इत्यादींवर प्रसारीत करु नये. तसेच अधिकृत माध्यमाव्दारे माहिती न घेता दिशाभुल करणारी माहिती प्रसार माध्यमांवर प्रसारीत करु नये. 

3. धार्मीक स्वरुपाचे समुपदेशन, धर्म परिषद, धार्मीक गर्दीचे आयोजन करु नये. 

4. कोरोना विषाणु (कोव्हिड-19) चे अनुषंगाने घोषीत करण्यात आलेल्या क्वारंटाईन स्थळांच्या 100 मीटर परिसरांतर्गत एकत्रित येण्यास व हालचाल करण्यास निर्बंध घालण्यात येत आहे. 

5. शहरात खाजगी व सार्वजनिक ठिकाणी दोन किंबा दोन पेक्षा अधिक व्यक्‍ती एकत्र येतील असे सर्व प्रकारचे मिरवणुक, रॅली, लग्न समारंभ, सामुहिक कार्यक्रम, समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, सण, उत्सव, उरुस, जत्रा, मनोरंजनाचे कार्यक्रम, क्रोडा व इतर सर्व स्पर्धा, आंदोलने इ. यांना मनाई राहील. 

6. खाजगी व सार्वजनिक ठिकाणी दीन किंबा दोन पेक्षा अधिकव्यक्ती एकत्र येतील अशा सर्व प्रकारची कृत्ये जसे कार्यशाळा, कॅम्प, प्रशिक्षण वर्ग, देशांतर्गत व परदेशी सहली इ. यांचे आयोजन करण्यासाठी मनाई राहील. 

7. शहरातील दुकाने/सेवा आस्थापना/उपहारगृहे/खाद्यगृहे/ खानावळ, शॉपींग कॉम्प्लेक्स, मॉल्स, सुपर मार्केट, मनोरंजनाची ठिकाणे, क्लब/पब, क्रीडांगणे,मैदाने, जलतरण, तलाव, उद्याने, सिनेमागृहे, नाटयगृहे, शाळा, महाविद्यालये, खाजगी शिकवणी वर्ग, व्यायामशाळा, संग्रहालये, गुटखा- तंबाखु विक्री इत्यादी बंद राहील. 

8.सार्वजनिक स्थळी / कामाचे ठिकाणी मास्कचा वापर व सामाजिक अंतर ठेवणे अनिवार्य राहील. 

9.आंतरराज्यीय सीमा प्रवासी वाहतुकीकरीता बंद असेल. 

सदरचे आदेश खालील बाबतीत लागु होणार नाहीत :- 

1. किमान मनुष्यबळासह शासकोय/निमशासकीय कार्यालय, सरकारी महामंडळाचे उपक्रम/आस्थापना,अत्यावश्यक सेवेतील व्यक्‍ती, रुग्णालये, पॅथोलॉजी लेबोरेटरी, दवाखाना, विमानतळ व रिक्षा थांबे, बँक, पेट्रोल पंप इत्यादी याठिकाणी वावरताना चेह-यावर मास्क अत्यावश्यक असेल. 

2. अत्यंबिधी (कमाल 20 व्यक्‍तींपुरता मर्यादीत) 

3. अत्यावश्यक किराणा सामान, डेली निडस, फरसान, मीठाई दुकाने, दुग्ध/दुग्धीत्पादने, फळे व भाजीपाला, पार्सल स्वरुपात काऊंटर तसेच इतर मार्गांनी विक्रो/वितरण व वाहतुक करण्यास परवानगी राहील. 

4. सर्व हॉटेल/लॉज यांना तेथे वास्तव्यास असणा-या ग्राहकांना आरोग्य विषयक आवश्यक ती खबरदारी घेऊन रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थ बनवुन फक्त पार्सल सुविधा देण्यास परबानगी राहील. 

5. ज्या आस्थापना (उदा. माहिती व तंत्रज्ञान उद्योग) ज्यांच्याकडे देश व परदेशातील अति महत्वाचा(Critical national & international infrastructure) उपक्रमांची जबाबदारी आहे व सदर बंद राहिल्याने अशा उपक्रमांच्या प्रक्रियेला बाधा येवु शकते असे सर्व संबधित उपक्रम सुरु राहु शकतील, 

(परंतु यादृष्टीने सदर आस्थापना कार्यरत ठेवण्याच्या आवश्यकतेबाबत जिल्हादंडाधिकारी चंद्रपूर यांना विशेषरीत्या कळविणे बंधनकारक आहे.) 

6. प्रसारमाध्यमांचे (सर्व प्रकारचे दैनिक, नियतकालिके, टीव्ही न्युज चॅनेल इ.) कार्यालय. 

7. अन्न/औषधी/वैद्यकीय उपकरणे /इलेक्टीकल्स व इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची घरपोच सेवा देणा-या E-commerce सेवा उदा. अँमेझॉन,फ्लीपकार्ट, बिग बास्केट इत्यादी सुरु राहील. 

8.किमान मनुष्यबळासह बँका/एटीएम, कॅश लॉजिस्टीक आणि कॅश ट्रॉन्झकशन व अन्य संबधीत सेवा. 

9. मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे. . 

10 .टेलीकॉम, टपाल, इंटरनेट, डेटासेबा यांसह माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सेवा. 

11. अत्यावश्यक वस्तुंची पुरवठा साखळी आणि वाहतुक. 

12.शेतमाल आणि अन्य वस्तुंची आयात-निर्यात आणि बाहतुक. 

13. बंदरावरुन होणारी वाहतुक, मनुष्यबळ, कंटेनर फ्राईट स्टेशनचे कार्यान्वयन, साठवणुक, कस्टम हाऊस एक्स्चेंजची कार्यालय, रेल्वेच्या अत्यावश्यक सेवा. 

14.खाद्य पदार्थ, औषधे आणि वैद्यकीय उपकरणे यांसह अत्यावश्यक वस्तुंचे ई-कॉमर्सव्दारे वितरण. 

15. खाद्य पदार्थ, किराणा, दुध, दुग्धजन्य पदार्थ विक्री ब वाहतुक, ब्रेड, फळे, भाजीपाला, अंडी, 

मांस,मासे, बेकरी/पशु खाद्य यांची किरकोळ विक्री सकाळी 07.00 ते दुपारी 02.00 वाजेपर्यंतच सुरु राहील. 

16.खाद्य पदार्थ, किराणा, दुध, ब्रेड, फळे, भाजीपाला, अंडी, मांस, मासे, यांची वाहतुक व साठवण 

17.बेकरी आणि प्राळीव प्राण्यांसाठीचे खाद्यपदार्थ आणि पशुवैद्यकीय सेवा 

18.उपहारगृहांमधुन आणि खाजगी/घरगुती खानावळ यांचकडून होणारी घरपोच सेवा. 

19.औषधी निर्मीती, डाळ ब भात गिरणी, इतर जिवनाश्यक …न्नपदार्थ निर्मीती, साखर, दुग्धजन्य पदार्थ, पशुखाद्य, चारा निर्मीती घटक इत्यादी. 

20. रुग्णालये, औषधालय, चष्माची दुकाने, औषधांचे दुकाने, औषधांचे कारखाने, विक्रेते आणि वाहतुक. 

21.पेट्रोल पंप, एलपीजी गॅस, ऑईल एजन्सीज त्यांची साठवण आणि त्यांच्याशी संबधित वाहतुक. 

22. टँकर्सव्दारे पाणी पुरबठा करणा-या सेवा. 

23. पावसाळयापुर्वीची सर्व अत्यावश्यक कामे. 

24. अत्यावश्यक सेवांकरिता खासगी संस्थामार्फत पुरविल्या जाणा-या सुरक्षा सेवेसह अन्य सेवा देणाऱ्या संस्था 

25. अत्यावश्यक सेवांना किंबा कोरोना (कोव्हिड-19) प्रतिबंधासाठी होणा-या प्रयत्नांना मदत करणा-या खासगी आस्थापना. 

26.सर्व प्रकारचे शितगृहे / वखार, गोदामा संबधीत सेवा / घाऊक वितरणासाठी आणि वरील बाबींशी 

संबधीत पुरवठा साखळी. 

27.कृषी उत्पादन व किमान आधारभुत किंमत यांचेशी संबधीत कार्य करणारी'कृषी उत्पन्न बाजार समिती 

वा राज्य शासनातर्फे अधिकृत असलेले मंडी/बाजार विशेषत: कार्पुस, तुर व धान खरेदी, विक्री आस्थापना/दुकाने. 

28.शेतकरी व शेत मजुर यांचे कडून करण्यात येणारी शेती विषयक कामे मासेमारी व मस्त्यव्यबसाय 

संबधी सर्व कामे व शेती विषयक औजारे/यंत्र विक्री व दुरुस्ती संबधीत मान्यताप्राप्त दुकाने/आस्थापना 

(किमान मनुष्यबळासह ) 

29.अनुसूचित क्षेत्र व बिगर अनुसूचित क्षेत्र, ( FRA ) क्षेत्र यातील गौण वनउत्पादने गोळा करणे, प्रक्रिया 

करणे, वाहतुक व विक्री आणि वन व वनेत्तर क्षेत्रातील तेंदुपत्ता संकलन केंद्र, ब गोदामापर्यंत त्याची 

वाहतुक. 

30.वनातील आगी रोखण्याकरीता जंगलात पडलेले लाकुड याची तात्पुरती/ विक्री आगारापर्यंतची वाहतुक 

31.शेती संबधीत यंत्रे अवजारे चालविण्यासाठी आवश्यक असणारा मजुर वर्ग/ केंद्र (Custom Hiring Centers - CHC ) 

32.खते, किटकनाशके व बियाणे यांचेशी निगडीत उत्पादन व पॅकजींग आणि किरकोळ विक्री संबधीत उद्योग/आस्थापना/दुकाने. 

33. आंतरराज्यीय सीमा प्रवासी वाहतुकीकरीता बंद असेल परंतु सर्व प्रकारची मालवाहतुक, अत्यावश्यक मालवाहतुक नसली तरी परवानगी असेल. राज्यांतर्गत /आंतरराज्यीय मालवाहतुक समयी ट्रक चालक व अतिरिक्‍त एक व्यक्ती वैध कागदपत्रासह मालवाहतुक अत्यावश्यक असली अथवा नसली तरी सुरु राहील. त्याकरिता वेगळा परवाना आवश्यक नाही. मालवाहतुक करुन खाली ट्रकाची वाहतुक सुध्दा यामध्ये समाविष्ठ राहील. 

34.राज्यांतर्गत व आंतरराज्यीय कृषी/फलोत्पादन संबधीत अवजारे/यंत्रे जसे पेरणी/कापणी यांची वाहतुक. 

35.जिवनावश्यक वस्तु व सेवा/अत्यावश्यक मालवाहतुक सेवा या बाबींशी संबधातील पुरवठा साखळी सुरळीत राखण्याकरिता आणि शासकीय वाहने/रुग्णवाहीका/ट्रक इ. ची दुरुस्ती ब देखभाल करण्याकरीताची गॅरेज/वर्कशॉप/स्पेअर पार्ट पुरवठादार यांची दुकाने/आस्थापना (योग्य ती सुरक्षितताराखुन किमान मनुष्यबळासह), 

36.टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर (TSPs) व यांच्यासाठी काम करणारे सरकारी/खाजगी//कंत्राटी क्षेत्रातील अधिकारी/कर्मचारी यांना टेलिकॉम सेवा सुरळीत सुरु राहाबी याकरिता कोरोना प्रतिबंधात्मक क्षेत्र (Containment Zone / Hotspot //सिलींग करण्यात आलेल्या इमारती व कॉम्प्लेक्स/लॉकडाऊन) इ.क्षेत्रामध्ये असलेल्या टेलिकॉम सबधीत यंत्रणेची देखभाल व दुरुस्ती. 

37. प्राम पंचायत स्तरावरील सरकार मान्य (CSC) सेंटर. 

38.इलेक्ट्रीकल्स ट्रॉन्सफार्मर दुरुस्ती /स्बयंरोजगार करणारे कामगार/कारागीर जसे इलेक्ट्रीशियन, संगणक दुरुस्ती तंत्रज्ञ, प्लंबर, मोटर मेकॅनिक, कारपेंटर यांची घरपोच सेवा. 

39.कोळसा व खनिज उत्पादन वाहतुक ब खनिकर्माकरीता आवश्यक स्पोटके ब इतर सेवांचा पुरवठा व वाहतुक. 

40. लघु अथवा मध्यम स्वरुपातील अत्यावश्यक उद्योग सेवा जसे पिठाची गिरणी/डाळ निर्मीती / खाद्य तेलाचे उत्पादन कारखाने. उपरोक्‍त वरील सर्व निर्बंध लोकांच्या वाहतुकीवर असेल, वस्तुंच्या दळणवळणावर नाहीत. त्याचप्रमाणे अत्यावश्यक वस्तु व सेवांचा पुरवठा करणा-या संस्था, संबधीत कर्मचा-यांसाठी असणा-या बाहनांवर अत्यावश्यक सेवा असे ठळकपणे दिसणारे स्टिकर लावणे बंधनकारक असेल. 

सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्‍ती भारतीय दंड विधान संहिता कलम 188, 269, 270, 271 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील. उपरोक्त ठिकाणे/कार्यक्रम येथील संबधीत आयाजक तसेच आस्थापना मालक/ चालक/व्यवस्थापक यांना प्रत्येकास आदेशापुर्वी स्वतंत्र नोटीस बजावणी शक्‍य नसल्याने फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त अधिकारानुसार सदरचा आदेश एकतर्फी काढण्यात आलेला आहे. याबाबतची माहिती उपविभागीय दंडाधिकारी, तालुका दंडाधिकारी, प्रसार माध्यमे, पोलीस स्टेशन, यांचे नोटीस बोर्डवर नागरीकांचे सुविधेसाठी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.