नागपूर : अरूण कराळे
कोरोनाग्रस्त रुग्णांना रक्त पुरवठा करतांना जिल्ह्यातील हॉस्पिटलच्या रक्तपेढीचा साठा कमी होत असून भविष्यात रक्ताची गरज भासणार असल्याने सामाजिक बंधिलकी जपत राष्ट्रीय कार्यात सहभागी होऊन नागरिकांनी स्वयंप्रेरणेने रक्तदान करून समाजाचे ऋण फेडण्याचे आवाहन हिंगणा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अश्विन बैस यांनी केले .
मंत्री सुनील केदार ,युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्याजित तांबे ,कुंदाताई राऊत यांच्या मार्गदर्शनात हिंगणा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अश्विन बैस यांनी मंगळवार ३१ मार्च रोजी युवक काँग्रेस तर्फे आयुष ब्लड बँकच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले .
यावेळी प्रा. एस .श्रीधर,श्रीमती स्नेहा ,शिवाजी भोसले,सविता खवासे,राजू गोरकर,पंकज फलके,सागर बैस,मिथुन वायकर, निकेश भागवतकर, अक्षय व्यापारी,पियूष बांते,शरद आंदे,नितीन वानखेडे,शैलेश क्षिरसागर,आकाश गायकवाड, सोनू कुकडकर,अनिकेत आंदे,रोहित रेवतकर,अनिकेत तितरमारे,अंकित बिसेन,मंगेश शक्रवार उपस्थित होते.