चांपा/प्रतींनिधी:
लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार बुडाला त्याचा फटका दारिद्रय रेषेखालील आदिवासी ,भटक्या जमातीना बसला.शहरात जाऊन तारेंवरचा खेळ, व भीक मागून हातावर मिळेल त्यातच उदरनिर्वह करणाऱ्या गोरगरिबावर उपासमारीची वेळ आली.
त्यात सरपंच अतिश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली "अभी नही, तो फिर कब"नागपूर ग्रुप व जनसेवा आप फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अति आवश्यक गरजुंना आरोग्य किट सोबतच अन्नधान्य किटचे ही वाटप मदत करणाऱ्या डॉक्टर व उद्योजक, अधिकार्यांना घेऊन गावागावात जाऊन सरपंच अतिश पवार यांनी केले.
सरपंच अतिश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमाअंतर्गत कुही, उमरेड तालुक्यातील खेतापुर, ससेगाव, चांपा, सुकळी, मांगली, खापरी, हेटी उटी, सुरगाव,इत्यादी गावामध्ये हातावर काम करून पोट भरणाऱ्या गरजुंवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे उपासमार सुरू झाली. चांपा परिसरातील काही गावांमध्ये भटक्या, आदिवासी समाजातील अनेक कुटुंबियांना उपाशी पोटी रात्र काढावी लागत आहे.
त्यांच्यावर उपासमार आल्याचं समजताच सरपंच अतिश पवार यांनी माझी अप्पर पोलीस महासंचालक टि. एस भाल यांच्याशी संपर्क साधला असता नागपूर येथील डॉक्टर, उद्योजक, प्रशासकीय अधिकार्यांनी मदत करण्याचे जाहीर केले त्यात सरपंच अतिश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली
"अभी नहीं तो फिर कब" या ग्रुपने उमरेड, कुही तालुक्यातील अतिआवश्यक गरजुंना मदत करण्यासाठी 245 जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे गावागावात जाऊन उपासमार सुरु असणाऱ्या गरजुंवतांना अन्नधान्य किट,तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या किट, मास्क वाटप,इत्यादी गोरगरीब गरजूंना सोबतच वयोवृद्ध, एकल महिला, अपंगाना अत्यावश्यक मदतीचा हात दिला. सरपंच अतिश पवार यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी "अभी नही तो फिर कब "सोशल ग्रुपचे चार्टर्ड अकाउंटट सचिन मुकेवार , स्किन स्पेशलिस्ट डॉ .सुशील पांडे , त्वचा विशेषज्ञ डॉ .सुधीर ममीद्वार, महाराष्ट्र मेट्रोचे विवेक होकम , विमा सर्वेक्षणकर्ता रवी पहलजानी , टाटा कन्सल्टंटन्सीचे प्रसाद पेंढारकर , आर्किटेक्ट हितेश ठोकर , उद्योगपती अमेया खानोलकर , राहुल बनकर , चांप्याचे सरपंच अतिश पवार, उपसरपंच अर्चना सिरसाम , मंजूषा आदींच्या उपस्थीतीत 245 गोरगरीब गरजूना अन्नधान्य किटचे वाटप केले .यावेळी अन्नधान्य प्राप्त गरजूनी सरपंच अतिश पवार यांचे आभार मानले .